कुडाळातील २२ पुरुषांना ‘सुधारक सन्मान’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळातील २२ पुरुषांना
‘सुधारक सन्मान’ पुरस्कार
कुडाळातील २२ पुरुषांना ‘सुधारक सन्मान’ पुरस्कार

कुडाळातील २२ पुरुषांना ‘सुधारक सन्मान’ पुरस्कार

sakal_logo
By

99671
कुडाळ ः सुधारक सन्मान पुरस्कार विजेत्यांसह मान्यवर.

कुडाळातील २२ पुरुषांना
‘सुधारक सन्मान’ पुरस्कार
सिंधुदुर्गनगरी ः कुडाळ तालुक्यातील २२ गावांतील पुरुषांना मान्यवरांच्या हस्ते सुधारक सन्मान पुरस्कार व चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बालविकास विभाग (महाराष्ट्र शासन अंगिकृत) नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प द्वारा स्वाधार लोकसंचलित साधन केंद्र कुडाळ जेंडर व न्यूट्रिशियन घटकांतर्गत तालुकास्तरीय पुरुष सुधारक सन्मान वितरण कार्यक्रम नुकताच कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये झाला. यावेळी नाबार्डचे जिल्हा महाप्रबंधक अजय थुटे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लेखाधिकारी आशालता जमने, स्वाधार लोकसंचलित साधन केंद्र कुडाळ अध्यक्षा मानसी धुरी, उपाध्यक्षा स्वाती मांजरेकर, सचिव राजेश्वरी कुडाळकर, स्वाधार संस्थेच्या व्यवस्थापिका प्रीतम केरवडेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावत्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित स्वाधार लोकसंचलित साधन केंद्र, कुडाळच्यावतीने जे पुरुष समाजात स्त्रियांना समानतेने वागवितात, त्यांचा सन्मान होण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लेखाधिकारी श्रीमंती जमने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. नाबार्डचे जिल्हा महाप्रबंधक श्री. थुटे यांनी मार्गदर्शन केले. व्यवस्थापक श्रीमती केरवडेकर यांनी आभार मानले.