रत्नागिरी-खून करून आलेल्या दोघांना रत्नागिरीत बेड्या

रत्नागिरी-खून करून आलेल्या दोघांना रत्नागिरीत बेड्या

खून करून आलेल्या दोघांना रत्नागिरीत बेड्या
रत्नागिरी ः नवी मुंबईत महिलेचा खून करून आंबेशेत येथे आश्रय घेतलेल्या दोन संशयितांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघेहीरत्नागिरीत बिनधास्त वावरत होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत खून करून दोन संशयित आरोपी रत्नागिरीत आश्रयाला आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या पथकाने रत्नागिरी शहर पोलिसांना दिली होती. शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी तत्काळ यंत्रणा कामाला लावली. संशयितांच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली. चौकशी दरम्यान दोघेजणं आंबेशेत-बौद्धवाडी येथील एका घरात आश्रयाला आले असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्या ठिकाणी जावून दोघांनाही ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी घर मालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश साळुंखे, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, गणेश सावंत, विनय मलवाल, आशिष भालेकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com