दुचाकी-मोटार अपघातात
असलदेत दुचाकीस्वार गंभीर

दुचाकी-मोटार अपघातात असलदेत दुचाकीस्वार गंभीर

99722
असलदे ः अपघातग्रस्त दुचाकी.

दुचाकी-मोटार अपघातात
असलदेत दुचाकीस्वार गंभीर
नांदगाव, ता. ३० ः असलदे-गावढण येथे पिरबाबा दर्ग्यापासून काही अंतरावर असलेल्या धोकादायक वळणावर दुचाकी व मोटारीमध्ये अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मागे बसलेली महिला किरकोळ जखमी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून आज सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, देवगड-निपाणी मार्गावर कोळोशीकडून नांदगावच्या दिशेने दुचाकीवरून (एमएच ०७ एपी १८५८) विकास इंदप हे पत्नीसोबत चालले होते. असलदे-गावढण येथील धोकादायक वळणावर देवगडच्या दिशेने जात असलेल्या मोटारीची (एमएच ०७ क्यू ३७३७) दुचाकीला धडक बसली. या अपघातात विकास इंदप हे गंभीर जखमी झाले. तर पत्नीला किरकोळ दुखापत झाली. अपघात नेमका कसा झाला, हे समजू शकले नाही. अपघातानंतर नागरिकांनी मदतकार्य केले. जखमीला कणकवली येथे रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच कोळोशी पोलिसपाटील संजय गोरुले यांनी घटनास्थळी भेट देऊन कणकवली पोलिसांत माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com