
मुरुड किनाऱ्यावर पार्किंग सुविधेची गरज
मुरुड किनाऱ्यावर पार्किंग सुविधेची गरज
दाभोळः दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था गरजेची असताना या ठिकाणी प्रशासनाकडून पार्किंगची व्यवस्था न झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुरुड, कर्दे, पाळंदे, लाडघर या गावांना पर्यटकांची विशेष पसंती आहे. मुरुड गावाकडे असंख्य पर्यटक येत असतात. मात्र समुद्रकिनारी गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे पर्यटक त्याच्या गाड्या समुद्रकिनारी घेवून जातात. भरतीच्या वेळी अनेकदा पर्यटकांच्या गाड्या समुद्रात वाहुनही जातात. पर्यटक समुद्रावर अर्थात पुळणीत गाड्या घेवून गेल्यावर वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे किनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांना धोका उत्पन्न होत असून नंतर गाड्या तीव्र वेगाने फिरवत असतात. समुद्र किनाऱ्यावर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण होत आहे.