नगरपंचायत स्वच्छतादूतांचा कुडाळात भाजपतर्फे सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरपंचायत स्वच्छतादूतांचा
कुडाळात भाजपतर्फे सन्मान
नगरपंचायत स्वच्छतादूतांचा कुडाळात भाजपतर्फे सन्मान

नगरपंचायत स्वच्छतादूतांचा कुडाळात भाजपतर्फे सन्मान

sakal_logo
By

99939
कुडाळ ः ‘मन की बात’ कार्यक्रम पाहण्यास एकत्र आलेले भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते.

नगरपंचायत स्वच्छतादूतांचा
कुडाळात भाजपतर्फे सन्मान
कुडाळ, ता. २ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०० वा भाग भाजपच्यावतीने येथील मराठा समाज हॉलमध्ये कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला. याला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला संबोधित करतात. या कार्यक्रमाचा १०० वा भाग नुकताच झाला. या भागाचे येथील शहर भाजपतर्फे मराठा समाज हॉलमध्ये प्रसारण करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर, श्री. म्हापसेकर, ‘मन की बात’चे संयोजक बंड्या सावंत, शहराध्यक्ष राकेश कांदे, कुडाळ नगरपंचायत भाजप गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक नीलेश परब, ॲड. राजीव कुडाळकर, चांदणी कांबळी, शक्ती प्रमुख राकेश नेमळेकर आदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’च्या प्रत्येक कार्यक्रमातून विविध विषय मांडले आहेत. त्यापैकी स्वच्छता या महत्त्वाच्या विषयास अनुसरून १०० व्या कार्यक्रमानिमित्त भाजपने नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा केलेला सन्मान कौतुकास्पद आहे, असे जिल्हाध्यक्ष तेली यांनी सांगितले.