अर्जुना नदीपात्रातील गाळ उपशाला सुरवात

अर्जुना नदीपात्रातील गाळ उपशाला सुरवात

rat२p३०.jpg
९९९५९
राजापूरः गाळ उपशाच्या आरंभाप्रसंगी उपस्थित तहसीलदार शीतल जाधव.
------------
अर्जुना नदीपात्रातील गाळ उपशाला सुरवात
राजापूर, ता. २ः पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या सुचनेनुसार, इरिगेशन विभागाकडून अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसा करण्यात येत असून त्याचा आरंभ महाराष्ट्र दिनी (ता. १) तहसीलदार शीतल जाधव यांच्या हस्ते झाला. अर्जुना-कोदवली नद्यांचा संगम परिसरासह संगमाच्या वरचा भाग आणि संगमाच्या खालचा भाग या परिसरातील गाळाचा उपसा होणार आहे.
या वेळी तहसीलदार जाधव यांच्यासह मुख्याधिकारी प्रशांत भोसले, माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, सुरेश कोळेकर, अशफाक हाजू, रवींद्र नागरेकर, जितेंद्र जाधव, महेश शिवलकर, सागर खडपे, अनिलकुमार डोंगरे, सुनील पवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत यांनी राजापूर दौऱ्याच्यावेळी अर्जुना नदीपात्र, बंदरधक्का परिसराची पाहणी केली होती. त्या वेळी त्यांनी अर्जुना नदीपात्रातील गाळाचाही उपसा करण्याचे आश्‍वासित केले होते. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या सुचनेनुसार, अर्जुना नदीपात्रातील गाळाचा इरिगेशन विभागाकडून उपसा केला जात आहे. त्यासाठी इरिगेशन विभागाचे एक डोझर, एक पोकलेन आणि दोन डंपर्स कार्यरत आहेत.
दरम्यान, महिन्याभरानंतर सर्वसाधारणतः नियमित पावसाळ्याला सुरवात होणार आहे. त्यापूर्वी म्हणजे महिनाभराच्या कालावधीमध्ये अर्जुना नदीपात्रातील जास्तीत जास्त गाळ उपसा करण्यात येणार आहे.

चौकट
दृष्टिक्षेपात अर्जुना नदीपात्रातील गाळाची स्थिती
मुंबई-गोवा हायवे पूल ते संगमः १२८० मीटरः ८८३३९.५ क्युबिक मिटर
अर्जुना नदीपात्रातील गाळाची असलेली डेप्थः सुमारे १ते १.५ मीटर
सायबाचे धरणः सुमारे दीड किमीः सुमारे ६ लाख १७ हजार क्युबिक मिटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com