राजापूर-ब्रिटीशकालीन सायबाचे धरण होणार गाळमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-ब्रिटीशकालीन सायबाचे धरण होणार गाळमुक्त
राजापूर-ब्रिटीशकालीन सायबाचे धरण होणार गाळमुक्त

राजापूर-ब्रिटीशकालीन सायबाचे धरण होणार गाळमुक्त

sakal_logo
By

rat२p३२.jpg
९९९६१
राजापूरः सायबाच्या धरणातील सुरू असलेला गाळ उपसा.
--------------
लोकसहभागातून नद्या होणार गाळमुक्त
सहा नद्यांमधील काम एकाचवेळी सुरू; गाळाची विल्हेवाट लावणे गरजेचे

कॉमन इंट्रो

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण तालुक्यातील नद्यांमधील गाळ उपशाचे काम जोरात सुरू आहे. शास्त्री, सोनवी, कोदवली, अर्जूना, गौतमी, काजळी नदीतील गाळ उपशाला सुरवात झाली आहे. काही ठिकाणी पाटबंधारे विभागातर्फे तर काही ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि नाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने गाळ उपसा सुरू आहे. गाळ उपशामुळे नद्या मोकळा श्वास घेणार असून त्यामुळे पुराचा धोकाही कमी होणार आहे. मात्र गाळ उपशा केल्यानंतर तो नदीशेजारीच टाकण्यात येत आहे. हा गाळ पावसाळ्यापूर्वी न उचलल्यास पुन्हा हा गाळ नदीपात्रात जाणार आहे. त्यामुळे गाळ उपशाचा मुख्य उद्देश साध्य होणार नाही. त्यामुळे उपसलेल्या गाळाची विल्हेवाट वेळीच लावणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थ आणि तज्ञ व्यक्त करत आहेत.
---------------

ब्रिटीशकालीन सायबाचे धरण होणार गाळमुक्त
गाळ उपशाला सुरवात; नाम फाउंडेशनची मदत
राजापूर, ता. २ः कोदवली येथे ब्रिटिशांच्या काळात बांधकाम झालेले आणि गेल्या १४५ वर्षापासून राजापूकरांची तहान भागवत असलेल्या सायबाच्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झाला आहे. त्याचा नाम फाउंडेशनच्या साहाय्याने उपलब्ध झालेल्या मशिनरीच्या साहाय्याने गाळ उपशाचे काम हाती घेतले आहे. या उपशामुळे धरणामध्ये भविष्यामध्ये अधिक पाणीसाठा होणार असून, हा पाणीसाठा एप्रिल-मेमधील पाणीटंचाई दूर होण्याच्यादृष्टीने अधिक उपयुक्त ठरणार आहे.
या धरणातून पाणी आणण्यासाठी नगर पालिकेला कोणताही खर्च करावा लागत नाही. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झालेला असून गळतीही लागलेली आहे. त्याचा फटका शहरातील पाणीपुरवठ्याला होऊ लागल्याने त्या ठिकाणी नवीन धरण बांधण्यात येत आहे. त्याचवेळी धरणातील गाळाचा उपसा व्हावा अशीही मागणी होऊ लागली आहे. गाळ उपशासाठी मात्र, मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने गाळ उपसा झालेला नाही. गेल्या चार महिन्यांपासून नाम फाउंडेशन, महसूल आणि नगरपालिका यांच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याचे काम सुरू आहे. हे बहुतांश काम पूर्ण झाले असून आता सायबाच्या धरणातील गाळाचा उपसा करण्याचे काम सुरू झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून नाम फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने धरणातील गाळ उपशाचे काम सुरू झाले आहे.

चौकट
दृष्टीक्षेपात सायबाच्या धरणातील गाळ
गाळ परिसरः सुमारे दीड किमी.
दृष्टिक्षेपात साचलेला गाळः सुमारे ६ लाख १७ हजार क्युबिक मिटर