
चिपळुणातील जलतरण तलाव हाऊसफुल्ल!
३२ (पान २ साठी)
-rat२p३७.jpg ः
९९९९९
चिपळूण ः शहरातील रामतीर्थ जलतरण तलावात पोहोण्याचा आनंद लुटताना नागरिक.
--
चिपळुणातील जलतरण तलाव हाऊसफुल्ल!
उन्हाळी सुट्टीमुळे कोचिंग बॅचेसमध्ये वाढ ; विद्यार्थी लुटताहेत आनंद
चिपळूण, ता. २ ः वाढते तापमान आणि शाळा-महाविद्यालयांना पडलेली उन्हाळी सुट्टी यामुळे चिपळूण नगर पालिकेचे रामतीर्थ जलतरण तलाव गजबजून गेले आहे. विद्यार्थी, तरुण-तरुणी यांच्यासह नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने हे तलाव सध्या हाऊसफुल्ल झाले आहे. कोचिंग बॅचमध्ये विद्यार्थीवर्गाचा सहभागही लक्षणीय दिसून येत आहे. त्यामुळे व्यवस्थापक हरिओम फॅसिलिटी सर्व्हिसेसचे प्रितम जाधव यांनी कोचिंग बॅचेसमध्येही वाढ केली आहे.
चिपळूण शहरातील रामतीर्थ तलावाशेजारीच जलतरण तलाव आहे. शहरातील हे एकमेव जलतरण तलाव असल्याने जलतरणपटूंसह नागरिकांची येथे मोठी गर्दी होते. गत अडीच ते तीन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव, एका तरुणाचा बुडून झालेला मृत्यू त्या पाठोपाठ महापुराचा तडाखा यामुळे जलतरण तलाव अशा विविध कारणांमुळे सुमारे तीन वर्षे हे जलतरण तलाव बंद होता. नागरिकांकडून जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्याची दखल घेत नगर पालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वीच या तलावाची डागडुजी केली तसेच हे जलतरण नागरिकांसाठी खुले केले. हरिओम फॅसिलिटी सर्व्हिसेस या संस्थेमार्फत सध्या या तलावाची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संस्थेचे संचालक प्रितम जाधव यांनीही येथे नागरिकांना पोहोण्याचा पुरेपूर आनंद लुटता येईल, अशी व्यवस्था केली आहे. सकाळी ६ ते सायं. ७ वाजेपर्यंत विविध बॅचेस सुरू आहेत. त्यासाठी मासिक, तिमाही पास, डेली गेटपास सुविधाही उपलब्ध आहे. महिला व मुलींकरिता स्पेशल बॅच, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष बॅच आहे. राष्ट्रीय जलतरणपटू व सर्टिफाईड कोच विनायक पवार, पौर्णिमा पाटील, निशा आंबेकर यांच्यासह बेसिक कोच शुभम दोडामनी, विक्रम जाधव यांच्यामार्फत बेसिक टू ॲडव्हान्स प्रशिक्षण दिले जात आहे.
-
कोट
जलतरण तलावातील कोचिंग बॅचेसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक व विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने कोचिंग बॅच फुल्ल झाली आहे. नागरिकांची गैरसोय नको यासाठी कोचिंग बॅचेसमध्ये वाढ करण्यात आली आहे.
-प्रितम जाधव, संचालक, हरिओम फॅसिलिटीज सर्व्हिसेस.