रिफायनरी रद्दसाठी
मालवणात घोषणा

रिफायनरी रद्दसाठी मालवणात घोषणा

रिफायनरी रद्दसाठी
मालवणात घोषणा
कुडाळ ः बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द करावा, यासाठी मालवण येथील यूथ बिट्स फॉर क्लायमेटच्या सदस्यांनी मालवण बंदरजेटी येथे आंदोलन करून रिफायनरी प्रकल्पाविरोधात घोषणा दिल्या. यथ बिट्सच्या सदस्यांनी प्रस्तावित प्रकल्पाच्या विरोधातील घोषणांचे फलक झळकावून प्रकल्पाचा निषेध केला. युथ बिट्सच्या सदस्यांनी मालवण बंदरजेटी येथून किल्ले सिंधुदुर्गवर जाणाऱ्या पर्यटकांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यावेळी काही पर्यटकांनी प्रकल्पाविरोधात घोषणा दिल्या. आंदोलनात मेघल डिसोजा, हार्दिक कदम, स्वाती पारकर, संजय वराडकर, दिक्षा लुडबे, दर्शन वेंगुर्लेकर, वैभवी सातार्डेकर, समृद्धी मळेकर, संजय मळेकर, ऐश्वर्य मांजरेकर, महादेव तळवडेकर, अजय कांबळी, सुनील पोळ, सचिन कांबळी, सिद्धेश मांजरेकर, मनीषा पारकर, स्वप्नील गोसावी, किरण हिर्लेकर आदी सहभागी झाले होते.
---------------------
‘बीडीएस’मध्ये
पोईप शाळेचे यश
मालवण ः ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत पोईप केंद्रशाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या परीक्षेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया रँकमध्ये स्थान मिळविले. पहिलीतून ऋचा केदार सावंत (९२ गुण) व हार्दिका राजाराम पाटकर हिने ९१ गुण प्राप्त करून सिल्व्हरमेडल, धारेश्वर श्रीधर नाईकने ८७ गुण प्राप्त करत ब्राँझमेडल प्राप्त केले. दुसरीतून आरुष चव्हाणने ९५ गुण मिळवून गोल्डमेडल, नमीष तावडे (८६) व सिद्धिविनायक ’सूर्यकांत नाईकने ८३ गुण प्राप्त करून ब्राँझमेडल प्राप्त केले. तिसरीतून शौर्य नितीन एरंडेने ९८ गुण मिळवून गोल्डमेंडल व दुर्वा परबने ८८ गुण प्राप्त करून ब्राँझमेडल प्राप्त केले. परीक्षेला बसलेले आदित्य पालव, स्वरा पाटील, ऋता आंबेरकर, वैभवी पालव विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शुभदा माधव, शिक्षक प्रशांत मुळे यांचे मार्गदर्शन लाभलेयशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख शोभा पालव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सोनिया चव्हाण, सदस्य पालकांनी अभिनंदन केले आहे.
----------------------
यक्षिणी विद्यालयाचे
रेखाकलेत यश
सावंतवाडी ः माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालयाने शासकीय रेखाकला परीक्षेत यश संपादन केले. ऑक्टोबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत १४ विद्यार्थी बसले होते. इंटरमिजिएट परीक्षेत चिन्मय रामचंद्र मिस्त्री याने अ श्रेणी प्राप्त केली आहे. तर शुभम बागवे, रघुनाथ कदम, विनोद घाडी आकांक्षा लाड, काजल परब यांनी क श्रेणी प्राप्त केली. एलिमेंटरी प्रथम परीक्षेत विद्यालयातून तनिषा परब, गौरी मेस्त्री, महादेव धुरी, अक्षय कुंभार, वेदांत पारकर शुभम सुतार, वेदांत धुरी, विशाल पालव यांनी प्राप्त केली. यशस्वी क श्रेणी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सगुण धुरी, उपाध्यक्ष बाळा जोशी, सचिव एकनाथ केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयप्रकाश आकेरकर, संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक साटम, पालक-शिक्षक उपाध्यक्ष कांचन मेस्त्री व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. प्रशालेतील शिक्षक सदाशिव सावंत व प्रज्ञा गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
-------------
कांदळगावात
डान्स स्पर्धा
कुडाळ ः मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील सिद्धार्थ विकास मंडळ, यशोधरा महिला मंडळ व सम्राट अशोकनगर यांच्यातर्फे गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्धिस्ट फेस्टिव्हलमध्ये १३ मेस रात्री १० वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ७,१३२, ५,१३२, ३,१३२ व उत्तेजनार्थ दोन क्रमाकांना प्रत्येकी १,६३२ रुपये व प्रत्येकी चषक देण्यात येईल. संपर्क वैभव कदम यांच्याशी करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com