धारावीत महाराष्ट्र दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत महाराष्ट्र दिन उत्साहात
धारावीत महाराष्ट्र दिन उत्साहात

धारावीत महाराष्ट्र दिन उत्साहात

sakal_logo
By

धारावीत महाराष्ट्र दिन उत्साहात
धारावी : महाराष्ट्र दिन व कामगार दिन धारावीत विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, राजकीय पक्षांनी उत्‍साहात साजरा केला. संत कक्कया विकास संस्था संचालित श्री गणेश विद्या मंदिर येथे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी शाळेचे वरिष्ठ शिक्षक राजाराम आरोटे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाची माहिती उपस्थितांना दिली. तर संस्थेचे सहसचिव नरसिंग कावळे यांच्या हस्ते ध्वजरवंदन करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव राजेश खंदारे, मुख्याध्यापक चंद्रशेखर बांदिवडेकर आदी उपस्थित होते. तसेच धारावीतील अनेक ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आले. धारावी पोलिस ठाणे येथेही महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
--
ईशान्य मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम
मुलुंड ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या संवादाच्‍या ‘शतकोत्सव’निमित्त खासदार मनोज कोटक यांनी स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेत अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि मोहिमेनंतर सर्वांनी एकत्र येत पंतप्रधान मोदींचे ऐतिहासिक ‘मन की बात’ ऐकले. याप्रसंगी महाराष्ट्र शासन पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सुविधा अनुदान अंतर्गत नागरी सुविधा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी श्रीनिवास त्रिपाठी, वैशाली पाटील, विलास सोहनी, संजय शुक्ला, प्रदीप गुप्ता, आरिफ सिद्धीकी, उमेश आचार्य आदी पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.