
सांस्कृतिक क्षेत्रात तळवडे गाव अग्रेसर
००१०५
सांस्कृतिक क्षेत्रात तळवडे गाव अग्रेसर
आमदार वैभव नाईक ः पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ : सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तळवडे गावाने उद्योजक घडविण्याची परंपरा अशीच पुढे सुरू ठेवावी, असे आवाहन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केले. शहरासारखा ग्रामपंचायत क्षेत्रात पर्यटन महोत्सव आयोजित करून तो मंडळाने यशस्वी करत प्रकाश परब यांच्या स्मृती जपल्या असून हे कार्य हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
प्रकाश परब मित्रमंडळ सर्व सेवाभावी संस्था व तळवडे ग्रामस्थांच्यावतीने तळवडे येथे पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा सत्कार आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार नाईक, सतीश सावंत व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध सांस्कृतिक व पारंपरिक लोककला कार्यक्रम यावेळी पार पडले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
जिल्हाप्रमुख सावंत म्हणाले, "प्रकाश परब यांनी कधीही राजकीय मतभेदातून काम केले नाही. जिल्हा बँकेत काम करताना शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या गोष्टी करता येतील. त्यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. जिल्हा परिषदेच्या मध्यमातून त्यांनी तळवडे गावात वेगवेगळ्या योजना राबविल्या. या जिल्ह्याचा विकास व्हावा, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पर्यटनातून तळवडे गावाचा विकास होण्यासाठी त्यांनी दूरदृष्टीने ठेवून पर्यटन महोत्सव आयोजित केला. त्यांचे कार्य कौतुकास्पद होते."
यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख राऊळ, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, बाळू कांडरकर, कुडाळ उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच गौरव मेस्त्री, बंड्या परब, अनिल जाधव, सोसायटी चेअरमन आप्पा परब व इतर संचालक, त्याचबरोबर विनोद काजरेकर, आनंद बुगडे, सुरेश गावडे, विलास परब, रवींद्र परब, बाबा परब, रवी काजरेकर, स्नेहल राऊळ, शामसुंदर मालवणकर, सदा गावडे, प्राजक्ता गावडे, विलास नाईक, बाबा मालवणकर, काका सावंत, गणेश परब, पर्यवेक्षक खानोलकर, दत्तप्रसाद परब, गजानन परब, जालिंदर परब, महेश परब, रोहित परब, योगेश सावंत, नमिता सावंत, नमिता परब, विनोद वराडकर, राजन रेडकर, अशोक दळवी, तात्या परब, संतोष राऊळ, अप्पा नागवेकर, बाळकृष्ण सामंत, साईनाथ परब, गिरीश शिरोडकर, सूरज डिचोलकर, केशव तुळसकर, रघू गावडे, राजन जाधव आदींसह प्रकाश परब प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.