गाबीत समाज बांधवांनो, एकत्रित या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाबीत समाज बांधवांनो, एकत्रित या!
गाबीत समाज बांधवांनो, एकत्रित या!

गाबीत समाज बांधवांनो, एकत्रित या!

sakal_logo
By

00146
मालवण ः गाबीत महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात झालेली गर्दी. (छायाचित्र ः गणेश गावकर)

गाबीत समाज बांधवांनो, एकत्रित या!

परशुराम उपरकर; मालवणात गाबीत महोत्सवाचा समारोप

मालवण, ता. २ ः सर्व गाबीत बांधवांच्या सहकार्यातून गाबीत महोत्सव यशस्वी झाला. गाबीत एकत्र आले तर काय करू शकतात हे महोत्सवातून दाखवून दिले आहे; मात्र, आम्ही महोत्सव करून गप्प बसणार नाही. समाज घटक व तरुणांच्या उन्नतीसाठी आम्ही काम करणार आहोत. यापुढेही गाबीत बांधवांनी एकत्र येत समाजाच्या पाठीशी राहावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी येथील गाबीत महोत्सवाच्या समारोपप्रसंगी केले.
मालवण दांडी किनाऱ्यावर आयोजित चार दिवसीय गाबीत महोत्सवाची सांगता झाली. यानिमित्त गेले चार दिवस गाबीत समाजातील लोकांसाठी विविध स्पर्धा, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. या महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात अखिल भारतीय गाबीत समाज संघांचे अध्यक्ष उपरकर, प्रा. डॉ. संतोष मेतर, आरोंदा सरपंच गीता तारी, डॉ. श्याम चौगुले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांना गाबीत भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी गाबीत समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच महोत्सव आयोजनासाठी योगदान देणाऱ्या समाज बांधवांचा गाबीत सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.

स्थानिक समितीतर्फे राज्य अध्यक्ष सुजय धुरत, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर आदींचा सत्कार करण्यात आला. या महोत्सवास अभिनेत्री तारका पेडणेकर यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, जिल्हा कार्यवाह बाबा मोंडकर, जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, देवगड अध्यक्ष संजय पराडकर, वेंगुर्ले अध्यक्ष राजन गिरप, सावंतवाडी अध्यक्ष अॅड. चांदोस्कर, स्वागत समिती अध्यक्ष अन्वय प्रभू, हरी खोबरेकर, दिलीप घारे, बाबी जोगी, पूजा सरकारे, सेजल परब, नारायण धुरी, सौरभ ताम्हणकर, रुपेश खोबरेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, पांडुरंग कोचरेकर, सुरवी लोणे, माधुरी प्रभू, संमेश परब आदी उपस्थित होते. दरम्यान, मुंबई येथील कलाकारांचा ऑर्केस्ट्रा सादर झाला. यावेळी उपस्थित तरुणाईने हिंदी गीतांवर एकच ठेका धरला.
--
विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
जलतरण स्पर्धा - महिला प्रथम - पायल सागवेकर, द्वितीय - प्रणाली सागवेकर, तृतीय - जागृती सागवेकर (सर्व रा. सागवे - वडपवाडी राजापूर), पुरुष गट - प्रथम - चेतन बांदेकर (वेंगुर्ला), द्वितीय - अमेय कोचरेकर ( श्रीरामवाडी वेंगुर्ले), तृतीय - गौरेश सागवेकर (सागवे - वडपवाडी राजापूर). नौकानयन स्पर्धा - प्रथम - उदय जाधव, मंदार घारे, रामचंद्र जाधव. द्वितीय - प्रथमेश गावकर, संजय गावकर, सुशांत गावकर. तृतीय - पंकज मालंडकर, धर्मराज कुबल, कुणाल कोचरेकर आणि पाककला स्पर्धा - प्रथम - सानिका दत्तात्रय बांदकर (कोळंबीचे लॉलीपॉप), द्वितीय - प्रांजल प्रदीप सारंग (कोळंबी सामोसे), तृतीय - सौ. आरोही अमित गावकर (शेंगाळ्याची कवटे) यांना पारितोषिके मिळाली.