
वनक्षेत्रपाल शिंदेंचा कोल्हापुरात सन्मान
००१२५
कोल्हापूर ः कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना गौरविताना मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम.
वनक्षेत्रपाल शिंदेंचा कोल्हापुरात सन्मान
कुडाळ ः वन संरक्षण आणि वन्यजीव व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना महाराष्ट्र दिनी मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांच्या हस्ते कोल्हापूर येथे गौरविण्यात आले. वनक्षेत्रपाल शिंदे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी विनापरवाना लाकूड वाहतुकीवर कारवाई केली असून जखमी अवस्थेत मिळालेल्या बिबट्या, खवले मांजरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. विहिरीत पडलेल्या वन्यप्राण्यांची बचाव पथकाच्या साहय्याने सुखरूप सुटका केली आहे. सामाजिक वनीकरणात सक्रिय सहभाग घेत निसर्गाचे संवर्धन, संरक्षणासाठी कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, विभागीय वनाधिकारी सागर गवते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात देवसू वनपाल सदानंद परब, सावंतवाडी लेखापाल मृणाल कुलकर्णी, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, आंबोली वनमजूर ज्ञानेश्वर गावडे यांनाही गौरविण्यात आले.
--