मालवणचा प्रीतम शिंदे ‘सिंधुदुर्ग क्लासिक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणचा प्रीतम शिंदे ‘सिंधुदुर्ग क्लासिक’
मालवणचा प्रीतम शिंदे ‘सिंधुदुर्ग क्लासिक’

मालवणचा प्रीतम शिंदे ‘सिंधुदुर्ग क्लासिक’

sakal_logo
By

00203
वेंगुर्ले ः ‘सिंधुदुर्ग क्लासिक’, या शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.


मालवणचा प्रीतम शिंदे ‘सिंधुदुर्ग क्लासिक’

वेंगुर्लेतील शरीरसौष्ठव स्पर्धा; चंदन कुबल ‘बेस्ट पोझर’

वेंगुर्ले, ता. ३ ः येथील श्री सातेरी व्यायाम शाळेच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त व्यायामशाळेच्या विद्यार्थी मित्रमंडळातर्फे व युवक शरीरसौष्ठव संस्था, वेंगुर्लेच्या सहकार्याने, तालुका बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मार्गदर्शनाने आणि सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित तिसरी ‘सिंधुदुर्ग क्लासिक २०२३’ स्पर्धा येथील श्री साई दरबार हॉलमध्ये नुकतीच प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाली. उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेत मालवणचा प्रीतम शिंदे ‘सिंधुदुर्ग क्लासिक’चा मानकरी ठरला.
स्पर्धेचे उद्‍घाटन शिवसेना जिल्हा संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर जयप्रकाश चमणकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय मोरे, विजय तांडेल, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शिवसेना शहरप्रमुख उमेश येरम, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, समीर वंजारी, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू किशोर सोन्सूरकर, संतोष परब, रामचंद्र देवजी, श्री. खानोलकर, अबोली सोन्सूरकर, अमोल तांडेल, दादा पेडणेकर, विजय फेंद्रे, अॅड. मनीष सातार्डेकर, शैलेश केसरकर, हेमंत चव्हाण, विलास नाईक, विनय धुरत आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत ‘सिंधुदुर्ग क्लासिक २०२३’चा विजेता फिटनेस वॉरियर, मालवणचा प्रीतम शिंदे ठरला. त्याला मानाचा हनुमान चषक, रोख रक्कम, मानाचा किताब, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. ‘बेस्ट पोझर’ किताब श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्लेचा चंदन कुबल, मोस्ट इम्प्रोवेड बॉडी बिल्डर किताब श्री सातेरी व्यायामशाळा, वेंगुर्लेचा अंकित सोन्सूरकर याने पटकावला. बेस्ट लोवर बॉडी पारितोषिक बेस्ट जोकर फिटनेस सावंतवाडीचा आनंद राऊळ याने पटकावले.
अंतिम निकाल असा ः ५५ किलो-हरिश रजपूत (एम्पायर जिम कुडाळ), अतुल डिकवलकर (पॉवर हाऊस कणकवली), चंदन कुबल (श्री सातेरी व्यायामशाला वेंगुर्ले), योगेश केरकर (सातेरी व्यायामशाळा), रुपेश वंजारी (एस. आर. के. फिटनेस कणकवली). ६० ते ६५ किलो-आनंद राऊळ (बिस्ट जोकर फिटनेस सावंतवाडी), शंकर माने (पावर हाऊस कणकवली), शेर बहादूर बोगती (यश फिटनेस सावंतवाडी), मेघःश्याम धुरी (श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्ले), साहिल भिडीये (स्वामिनी फिटनेस नांदगाव). ६० ते ६५ किलो गट-सहदेव नार्वेकर (सोन्सूरकर फिटनेस शिरोडा), ज्ञानेश्वर आळवे (गिअर अप कुडाळ), रितेश केळुस्कर (फिटनेस वॉरियर्स मालवण). दरम्यान, स्पर्धेचे पंच म्हणून विजय मोरे, शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर व राष्ट्रीय पंच अमोल तांडेल, हेमंत नाईक, विक्रांत गाड, सुधीर हळदणकर यांनी काम पाहिले.
--
७०-७५ किलोवरील स्पर्धेचा निकाल
७० ते ७५ किलो-प्रीतम शिंदे (फिटनेस वॉरियर्स मालवण), कौस्तुभ वर्दम (स्वामिनी फिटनेस नांदगाव). ७५ किलो -अंकित सोन्सूरकर (सातेरी वेंगुर्ले), गितेश चव्हाण (फिटनेस वॉरियर्स मालवण), आर्यन धारपवार (यश फिटनेस सावंतवाडी) याने पटकावला.