
रत्नागिरी
-rat२p४६.jpg-
२३M०००८८
रत्नागिरी ः आपुलकी या सामाजिक संस्थेतर्फे पालिकेतील पाणी व सफाई कर्मचाऱ्यांचा कामगारदिनी सन्मान करण्यात आला.
---
पालिकेच्या पाणी, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
आपुलकी संस्था ; कामगार दिनानिमित्त सामाजिक उपक्रम
रत्नागिरी, ता. २ ः कामगार दिनाचे औचित्य साधून, आपुलकी या सामाजिक संस्थेमार्फत पालिकेतील सफाई कामगार आणि पाणी विभागातील कर्मचारी यांचा सामाजिक बांधिलकीतून भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. येथील दामले विद्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका शिल्पा सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते तसेच आपुलकीचे सौरभ मलुष्टे, जान्हवी पाटील, राजेंद्र चव्हाण, उद्योजक राजा बामणे, स्वप्नील दळी, राकेश गुडेकर, तन्मय दाते, कौस्तुभ सावंत आदी उपस्थित होते.
मलुष्टे यांनी या उपक्रमाचा उद्देश विशेष केला. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर करणारे सफाई कामगार, संपूर्ण शहराला वेळेत आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा करणारे कर्मचारी यांचा सन्मान करणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने कामगार दिन साजरा झाल्याचे मलुष्टे यांनी सांगितले.
कामगारदिनाच्या निमित्ताने असा उपक्रम तेही पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी घेणे, ही फारच कौतुकास्पद आहे. आपला नेहमी सहभाग असेल, असे उपक्रम करणारे समाजात फार कमी लोक आहेत. त्यामुळे आपुलकी या सामाजिक संस्थेचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे शिल्पा सुर्वे यांनी सांगितले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चटई, बेडशीट आणि चादर देऊन कामगारांचा सन्मान करण्यात आला.