वननिवासींचा आज 
सावंतवाडीत मोर्चा

वननिवासींचा आज सावंतवाडीत मोर्चा

वननिवासींचा आज
सावंतवाडीत मोर्चा
सावंतवाडी ः सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील जंगल जमिनी पिढ्यानपिढ्या कसणाऱ्या शेतकऱ्यांना कायम मालकी हक्काने त्या मिळविण्यासाठी उद्या (ता.४) सावंतवाडी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी अकराला सावंतवाडी समाजमंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते सावंतवाडी शहर बाजारपेठ, प्रांत कार्यालय असा मोर्चा निघणार आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातील गवळी धनगर, बेरड, कातकरी, ठाकर आणि इतर पारंपरिक वननिवासी व वर्षानुवर्षे वन जमीन कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावे व्हाव्यात, या मागणीसाठी मोर्चा आयोजित केला आहे. संपत देसाई व अंकुश कदम यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.
--------------
केळूसला आजपासून
वर्धापन दिन सोहळा
वेंगुर्ले ः केळूस-मोबार येथील जलमाई देवीचा १६ वा वर्धापन दिन सोहळा ४ व ५ मे रोजी साजरा होत आहे. उद्या (ता. ४) सकाळी देवीची पूजा व धार्मिक विधी, दुपारी एकला महानैवेद्य, सायंकाळी चारला कीर्तन, सहाला वारकरी भजन, सायंकाळी सातपासून भजने, रात्री नऊला फुगडी कार्यक्रम, ५ ला सकाळी साडेसातला देवीची पूजा, आठला धार्मिक कार्यक्रम, दुपारी बाराला महानैवेद्य, साडेबाराला पालखी, दीडला तीर्थप्रसाद, ओटी भरण्याचा कार्यक्रम, महाप्रसाद, सायंकाळी साडेचारला भजन, पाचला हळदीकुंकू, भजने, सायंकाळी सातला दीपोत्सव, रात्री आठला महाआरती, फटाक्यांची आतषबाजी, पावणे दहाला गणेश-भवानी दशावतार नाट्य मंडळ, हुमरसचा ‘भवानी महिमा’ नाट्यप्रयोग होणार आहे.
---------------
मसुरेत रविवारी
विविध कार्यक्रम
मालवण ः मसुरे गावची मूळमाया, आदिदेवता, आदिशक्ती बिळवस येथील देवी सातेरी देवालयाच्या (जल मंदिर) गाभाऱ्यावरील कलश वर्धापन दिन सोहळा रविवारी (ता. ७) साजरा होत आहे. रविवारी सकाळी आठला गणेश पूजन व पुरोहितांच्या मंत्रघोषात कलश पूजन, नऊला धार्मिक विधी, अकराला श्री चिंतामणी निर्मित ‘मी मराठी’ प्रस्तुत ‘स्वरधारा’ ही सुगम संगीत मैफल (निर्माता बाळा कांबळी), दुपारी एक ते तीन महाप्रसाद, श्रींची महापूजा, सायंकाळी पाचला महाआरती, तीर्थप्रसाद, सातला भजने, रात्री दहाला नाईक मोचेमाडकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.
------------------
कणकवली येथे
धार्मिक कार्यक्रम
कणकवली ः शहरातील श्री देवी चौंडेश्वरी मंदिराच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ७ ते ८ मे दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.७) सकाळी आठपासून महिलांची कलश दिंडी, नऊला नवचंडी होमहवन व पूजाविधी, दुपारी साडेबाराला आरती, रात्री नऊला शैक्षणिक बक्षीस वितरण समारंभ, दहाला सांस्कृतिक कार्यक्रम, सोमवारी (ता.८) सकाळी नऊला श्री महापूजा, दुपारी साडेबाराला आरती, महाप्रसाद, सायंकाळी साडेसातला आरती होईल. लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ कणकवलीने केले आहे.
--
अणसूरला उद्या
डबलबारी सामना
वेंगुर्ले ः श्री देव इस्वटेश्वर कला, क्रीडा मंडळ भदगावडेवाडी, वरचे अणसूरतर्फे श्रींच्या महापूजेनिमित्त शुक्रवारी (ता. ६) रात्री आठला डबलबारी भजन सामन्याचे आयोजन केले आहे. यात विघ्नेश्वर प्रासादिक भजन मंडळ, हुमरस बुवा संतोष परब विरुद्ध श्री देवी भराडी प्रासादिक भजन मंडळ, वाडीवरवडे बुवा लक्ष्मण उर्फ सचिन धुरी यांच्यात होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com