कुणकेरी रेवीचे भाटलेत
नळपाणी योजनेचा प्रारंभ

कुणकेरी रेवीचे भाटलेत नळपाणी योजनेचा प्रारंभ

00217
कुणकेरी ः नळपाणी योजनेचे उद्‍घाटन करताना अशोक दळवी व अन्य.

कुणकेरी रेवीचे भाटलेत
नळपाणी योजनेचा प्रारंभ
सावंतवाडी, ता. ३ ः कुणकेरी रेवीचे भाटले (ता.सावंतवाडी) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासल्याने वाडीवरील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत मंत्री केसरकर यांनी स्वखर्चातून सहकार्य करून कुणकेरी रेवीचे भाटले येथील वाडीवर ओपन विहिरीवर पंप बसवून दिली. त्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते नळयोजनेचा प्रारंभ झाला. यावेळी तालुका प्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, गजानन नाटेकर, शिवसेना कोलगाव विभागप्रमुख महेश ऊर्फ पप्पू सावंत, कुणकेरी शाखाप्रमुख बाळा परब, उपशाखाप्रमुख मानाजी कुणकेरकर, बुधाजी गावडे, एस. आर. परब, नाना परब, बाबू परब, बाबल परब, आशिष परब, दिनेश परब, प्रमोद गावडे, बाबू परब, गणपत परब, मधुकर परब, महिला व वाडीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिल्याबद्दल महिला भगिनींकडून मंत्री केसरकर यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com