रत्नदुर्ग किल्ल्यावरील बुरूजाचे प्रवेशद्वार उजेडात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नदुर्ग किल्ल्यावरील बुरूजाचे प्रवेशद्वार उजेडात
रत्नदुर्ग किल्ल्यावरील बुरूजाचे प्रवेशद्वार उजेडात

रत्नदुर्ग किल्ल्यावरील बुरूजाचे प्रवेशद्वार उजेडात

sakal_logo
By

२ (टुडे पान १ साठी, अॅंकर)


- rat३p१८.jpg-
23M00279
रत्नागिरी ः रत्नदुर्ग किल्ल्याच्या बुरूजाचे प्रवेशद्वार
---
रत्नदुर्ग किल्ल्यावरील बुरूजाचे प्रवेशद्वार उजेडात

अभ्यासक महेश कदम ; रचना पाहण्याची संधी

रत्नागिरी, ता. ३ ः शहराजवळील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याच्या बुरूजाचे प्रवेशद्वार झाडांच्या विळख्यामुळे दिसून येत नव्हते. तेथील स्वच्छता केल्यानंतर हे प्रवेशद्वार उजेडात आले असून पर्यटकांसाठी त्याची रचना पाहण्याचा आनंद घेता येणार आहे, असे रत्नागिरीतील इतिहास अभ्यासक महेश कदम यांनी सांगितले.
रत्नागिरी शहराजवळील रत्नदुर्ग किल्ल्याचे बांधकाम म्हणजे बहामनी, शिवशाही, पेशवाई अशा तीन राजवटीत झाल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आहे. सुमारे एकशे वीस एकर विस्तार असणाऱ्‍या रत्नदुर्ग किल्ल्यावर चोवीस बुरूज आणि तटबंदी दिसते. बहामनी तसेच आदिलशाही राजवटीने सध्याच्या भगवती बालेकिल्ला येथे रत्नदुर्ग बंदराच्या संरक्षण व टेहळणीसाठी तटबंदीचे बांधकाम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली हा गड ताब्यात घेवून दीपगृह येथील बुरूज आणि पेठकिल्ल्याची लांब तटबंदी बांधून काढली. १७९० मध्ये धोंडो भास्कर प्रतिनिधी किल्लेदार असताना त्यांनीही रत्नदुर्गची मजबुती केली. मराठेशाहीच्या काळातील रत्नदुर्ग किल्ल्यावर जाणारा पूर्वेकडील बाजूने भव्य महादरवाजा आहे. तेथीद दोन दरवाजे ओलांडून गडात प्रवेश होत असे; परंतु शिवरायांच्या गडबांधणी शास्त्रानुसार गडावर शत्रूने प्रवेश केल्यास त्याला ठिकठिकाणी अटकाव करून त्याच्यावर मारा करण्यासाठी, मोक्याच्या ठिकाणी संरक्षक बुरूज उभारले आहेत. शिवरायांनी मिरे बंदर टेकडी ते दीपगृह अशी सलग तीन किमी लांबीची बुरूजयुक्त तटबंदी उभारली. पुढे कालौघातामध्ये ती तटबंदी फोडून, भगवती मंदिराकडे जाणारा सध्याचा डांबरी रस्ता बनवला गेला. या रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्‍या तुटलेल्या तटबंदीचा परिसर नेहमीच झाडाझुडपांनी झाकलेला असे. याच ठिकाणी एका बुरूजात उत्तरेस तोंड करून हा छोटेखानी अर्धवर्तुळाकार दरवाजा दिसतो. हा भाग नेहमीच झाडात झाकून गेलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या दुर्ग स्थापत्याचे एक वैशिष्ट्य असणाऱ्‍या हा दरवाजा किंवा बुरूज परिसरातील सफाई वेळोवेळी झाली पाहिजे. तसे झाले तर या परिसराची दुर्गप्रेमींना गडफेरी पूर्ण करणे शक्य होईल.
---

यासाठी केली असावी अशी रचना

किल्ल्यावरील बुरूजामध्ये प्रवेश करण्यासाठी सहा पायऱ्‍यांची रचना केलेली आहे. दरवाज्या शेजारी तोफेची जागा असून, कदाचित शत्रूने तटावर प्रवेश केल्यास, त्यावर तोफेचा मारा करून त्यांना तेथेच रोखता येईल अशी रचना तेथे केली असावी असा अंदाज अभ्यासकांचा आहे.