
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे
३ (टुडे पान १ साठी)
- ratchl३२jpg ः
२३M००२२७
चिपळूण ः शहरातून चित्ररथांसह मोटार बाईक रॅली काढण्यात आली.
-------------
देशाच्या उभारणीत डॉ. आंबेडकरांचे मोठे योगदान
प्रा. आनंद देवडेकर ; चिपळुणात चित्ररथांची लक्षवेधी रॅली
चिपळूण, ता. ३ ः भारत देश स्वतंत्र होत असताना देशाला एक राष्ट्र म्हणून उभे राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्या त्या बाबी लोकशाहीनुरूप उभ्या करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्राच्या उभारणीसाठी पायाभूत मूलभूत विकासापासून ते समाजाच्या सर्वांगीण विकासापर्यंत डॉ. आंबेडकरांनी केलेले काम अलौकिक आहे, असे प्रतिपादन विचारवंत प्राध्यापक आनंद देवडेकर यांनी येथे केले.
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती चिपळूण (स्थानिक) व मुंबई यांच्यावतीने विश्वभूषण, भारतरत्न, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ जयंती महोत्सव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात झाला. यानिमित्ताने शहरातून बाबासाहेबांच्या जीवनावरील चित्ररथांसह भव्य मोटार बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमधील जिवंत चित्ररथ देखाव्याने अवघ्या चिपळूणकरांचे लक्ष वेधून घेतले.
या वेळी अध्यक्ष विठोबा पवार, स्वागताध्यक्ष चंद्रकांत सावंत, आमदार शेखर निकम, हरिश्चंद्र पवार, शौकत मुकादम उपस्थित होते. प्रा. देवडेकर म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी देशावर खूप मोठे उपकार करून ठेवले आहेत. ज्या वेळी देशासमोर मोठे प्रश्न निर्माण झाले, ज्या वेळी देश अडचणीत आला त्या वेळी ते प्रश्न सोडवण्यासाठी, त्या अडचणी सोडवण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे.
धम्म ध्वजारोहण विठोबा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या आठही विभागातून बाबासाहेबांच्या चित्ररथांसह मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आली. तेथून चिपळूण एसटी स्टँड चिंचनाकामार्गे चिपळूण-कराड रोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्याला अभिवादन करून तेथून मुंबई-गोवा महामार्गे पुन्हा स्मारक भवन येथे चित्ररथांसह मिरवणूक तसेच मोटार बाईक रॅली निघाली. रॅलीचा स्मारक भवन येथे समारोप झाला. यामध्ये समता सैनिकदलाच्या ३०० जवानांचाही समावेश होता. विविध चित्ररथातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी मांडणी करण्यात आली होती. चित्ररथ हे या रॅलीचे विशेष आकर्षण होते. कुटरे विभागाने सुशांत जाधव यांच्या संकल्पनेतून महामानवांच्या व्यक्तिरेखा साकारणारा जिवंत देखावा साकारण्यात आला होता. तिसगाव विभाग, चिपळूण विभाग, सावर्डे विभाग, वहाळ विभाग, २७ गाव विभाग, चिवेली विभाग, कापरे विभाग या विभागांनीही वेगवेगळ्या विषयावरील चित्ररथ आणले होते.