अवैध विदेशी मद्यावर खवटीत मोठी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध विदेशी मद्यावर खवटीत मोठी कारवाई
अवैध विदेशी मद्यावर खवटीत मोठी कारवाई

अवैध विदेशी मद्यावर खवटीत मोठी कारवाई

sakal_logo
By

९ (टुडे पान १ साठी)


-rat३p६.jpg-
२३M००१७५
रत्नागिरी ः राज्य उत्पादन शुल्क विभागाने खवटीत अवैध विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्याला मुद्देमालास ताब्यात घेतले.
--
अवैध विदेशी मद्यावर खवटीत मोठी कारवाई

एक संशयित ताब्यात ; वाहनासह ४७ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, ता. ३ ः खवटी गावात (ता. खेड) राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध विदेशी मद्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले. यामध्ये सुमारे ४ हजार ३९२ बल्क लिटर विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. वाहनासह एकूण समारे ४७ लाख ७३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संशयित चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर व प्रभारी अधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर अवैध मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी गस्ती मोहीम राबवण्यात येत आहे. खेड निरीक्षकामार्फत राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी व गस्त घालण्यात येत होती. या पथकाला खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून खवटी गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग हॉटेल सृष्टी धाबासमोर त्यांनी सापळा रचला. काल संध्याकाळी सव्वाचार वाजता गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक संशयित पांढऱ्या रंगाची मोटार तपासणीसाठी थांबवण्यात आली. चालकाच्या मागील बाजूस हौद्यामध्ये सुमारे विदेशी मद्याचे एकूण ५०० बॉक्स मिळून आले. यामध्ये एकूण ४ हजार ३९२ ब. लि. विदेशी मद्याचा साठा आढळला. गाडीसह या मुद्देमालाची किंमत ४७ लाख ७३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मद्याची वाहतूक करणारा चालक प्रेमकुमार जेठाराम थोरी (रा. जेठाराम थोरी लालेकी बेरी बाँड, बारनेर राजस्थान) याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क खेड विभागाचे निरीक्षक सुनील आरडेकर, दुय्यम निरीक्षक महादेव आगळे तसेच जवान अनुराग बर्वे, जवान वाहनचालक अतुल वसावे तसेच भरारीपथक साताराचे जवान अमोल खरात यांनी भाग घेतला. गणपत जाधव व विजय सावंत यांनी सदर कारवाईस मदत केली. या गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक सुनील आरडेकर करत आहेत.