
धामापूर-बौद्धवाडी शाळेस परब दाम्पत्याकडून लॅपटॉप
00232
धामापूर ः मुख्याध्यापक दीपक गोसावी यांच्याकडे लॅपटॉप सुपूर्द करताना सरपंच मानसी परब. शेजारी उपसरपंच रमेश निवतकर व अन्य.
धामापूर-बौद्धवाडी शाळेस
परब दाम्पत्याकडून लॅपटॉप
ओरोस ः महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता. १) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामापूर-बौध्दवाडी शाळेस धामापूर गावाचे सुपुत्र तथा उद्योजक महेश परब व सरपंच मानसी परब यांच्या हस्ते लॅपटॉप प्रदान करण्यात आला. आपल्या ग्रामीण भागातील मुलांच्या आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून परब दाम्पत्याकडून ही भेटवस्तू देण्यात आली. यावेळी परब यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उपसरपंच रमेश निवतकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील नाईक, साक्षी नाईक, माजी सदस्य सूर्यकांत नाईक, ज्येष्ठ मार्गदर्शक राजन कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजिता धामपूरकर, संदेश धामापूरकर, शैलेश धामापूरकर, संजय जाधव, विकास वराडकर, सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक माता पालक सदस्य, ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी, अंगणवाडी सेविका शीतल नाईक, मदतनीस श्रीमती धामपूरकर आदी उपस्थित होते. शाळेचे उपशिक्षक श्री. पाटील यांची आंतरजिल्हा बदली झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळा रंगारगोटी करणारे विकास वराडकर यांनाही सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक दीपक गोसावी यांनी आभार मानले.