परीक्षेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षेत यश
परीक्षेत यश

परीक्षेत यश

sakal_logo
By

rat०३११.txt

बातमी क्र.. ११ (पान २ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat३p२.jpg-
२३M००१७१
रत्नागिरी ः एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणारे जागुष्टे हायस्कूलचे विद्यार्थी. सोबत मुख्याध्यापिका पूजा कात्रे व शिक्षक.
---
जागुष्टे हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत यश

रत्नागिरी ः कुवारबाव येथील श्रीमती रा. गो. जागुष्टे हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत यश मिळवले. यामध्ये वैष्णवी येळणे, मयुरी गडदे, प्रियांका वाघ, रोशन वायाळ, श्रेयस साळुंखे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळेतून २१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यातील १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि ५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ गणित प्राध्यापक डॉ. राजीव सप्रे, कीर्ती जाधव, सिद्धी जोशी, श्रावणी जोशी, मारूती खरटमोल, नीलम कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका पूजा कात्रे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
--

फोटो ओळी
-rat३p३.jpg-
२३M००१७२
रत्नागिरी ः ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात व्याख्याते अॅड. राजशेखर मलुष्टे यांचा सत्कार करताना सुभाष थरवळ. सोबत पद्मजा बापट, विजय निंबाळकर.
-

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सदस्यांचे वाढदिवस

रत्नागिरी ः रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या हॉलमध्ये झाला. त्या निमित्ताने रत्नागिरीतील ज्येष्ठ विधीज्ञ राजशेखर मलुष्टे यांचे व्याख्यान आयोजित केले. यामध्ये ॲड. मलुष्टे यांनी ईच्छापत्र, आई-वडिलांबाबत मुलांची जबाबदारी याबाबतच्या कायदेविषयक तरतुदी व त्याबातचे विस्तृत विवेचनपर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा पद्मजा बापट यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी व्याख्याते, ॲड. मलुष्टे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्याध्यक्ष विजय निंबाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
---------

फोटो ओळी
-rat३p४.jpg-
२३M००१७३
कुर्धे ः शैक्षणिक उठावातून येथील जि. प. शाळेची रंगरंगोटी करून भिंतीवर चित्रे, तक्ते साकारले आहेत.
---
शैक्षणिक उठावातून कुर्धे शाळेला नवा लुक

पावस ः कुर्धे येथील शिक्षणसुधारक समितीमार्फत कुर्धे जि. प. शाळा येथे अडीच लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव करण्यात आला. त्यातून संपूर्ण शाळेला रंगरंगोटी, शालेय तक्ते, शैक्षणिक पोस्टर्स यांच्या रूपाने या डिजिटल स्पर्धेच्या युगात तसेच शिक्षणाच्या प्रवाहात जिल्हा परिषद शाळा टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळा नव्या लुकमध्ये सज्ज झाली आहे. शाळेच्यावतीने शिक्षण सुधारक समितीचे आभार मानण्यात आले. यामुळे शाळेचा पट वाढण्यास टिकण्यास मदत होणार आहे. मुख्याध्यापक नवाथे, शिक्षकवृंद भाटकर, मयेकर, मयेकर, रांगणकर, उपसरपंच शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कोटकर या सर्वांनी संस्थेचे आभार मानले.