तायक्वांदो स्पर्धेत ‘अ‍ॅमॅच्युयर’चे यश

तायक्वांदो स्पर्धेत ‘अ‍ॅमॅच्युयर’चे यश

तायक्वांदो स्पर्धेत ‘अ‍ॅमॅच्युयर’चे यश
देवगड ः मायणी (सातारा) येथे झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्र खुल्या तायक्वांदो स्पर्धेत देवगड तालुका अ‍ॅमॅच्युयर तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी भरीव यश मिळवले. सातारा येथील स्पर्धेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आदी भागातून सुमारे ५०० खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेत तालुक्यातील क्युरेगी (फाईट) १२ वर्षांखालील मुलींमध्ये तसेच पुमसेमध्ये इरा नीळकंठ पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळविला. १२ वर्षांखालील मुलांमध्ये तृष्णात वानखेडे (तृतीय), राज कोयघाडी (तृतीय), मीत सरवणकर (द्वितीय), तर १४ वर्षांखालील मुलींमध्ये आर्या आचरेकर (द्वितीय), स्वरा सावंत (द्वितीय) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यशस्वी खेळाडूंना संस्थाध्यक्ष विवेक नलावडे यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षिका शेवंता नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
--
वेंगुर्ले भंडारी पतपेढी अध्यक्षपदी वायंगणकर
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी, वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी बाबली वायंगणकर, उपाध्यक्षपदी अंकिता बांदेकर यांची बिनविरोध निवड झाली. १९९४ मध्ये स्थापन झालेल्या भंडारी पतसंस्थेचे वायंगणकर हे १९ वे अध्यक्ष आहेत. १२ संचालक असलेल्या या पतसंस्थेत ११ संचालक बिनविरोध निवडून आले असून एक जागा रिक्त आहे. अध्यक्षपदी वायंगणकर यांची निवड जाहीर झाल्यानंतर भाजपच्यावतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी त्यांचे व उपाध्यक्ष बांदेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी संचालक सारिका काळसेकर, प्रकाश गडेकर, जगन्नाथ डोंगरे, गुरुनाथ कांबळी, व्यवस्थापक रेडकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com