संक्षिप्त

संक्षिप्त

पान २ साठी, संक्षिप्त

प्रा. पाध्ये यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
साडवली ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्रा. अनंत पाध्ये यांच्या शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले होते. कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विषयाचे अध्यापक पाध्ये ३२ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्याने या समारंभाचे आयोजन केले होते. प्रा. पाध्ये यांनी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाविद्यालय यांच्याकडून सेवा करताना मिळालेले सहकार्य व प्रोत्साहन तसेच प्रगती व विकासासाठी लाभलेल्या संधी याबाबत सविस्तर विवेचन केले. यानंतर देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने ॲड. वेदा प्रभुदेसाई, संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी प्रा. पाध्ये यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.

००१७८
निवधेतील रखडलेल्या रस्त्याचे भूमिपूजन
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील गवतमाळ-निवधे गवळीवाड़ी, धनगरवाड़ी ते साखरपा सुर्वेवाड़ी या सर्व वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम अपुरे राहिले होते. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने या रस्त्याला लागणारा निधी मंजूर करण्यात आला असून, त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला रवींद्र गुरव, निवधे गावचे गावकर राजेश गुरव तसेच गावचे पोलिस पाटील संतोष चव्हाण, निवधे गावचे ग्रामस्थ जयराम बेंद्रे, अनंत गुरव आदी उपस्थित होते.

- rat३p१०.jpg-
देवरूख ः देणगीचा धनादेश सुपूर्द करताना अविनाश लाड.

मामासाहेब भुवड कॉलेजला ५ लाख
साडवली ः कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर संस्थेच्यावतीने देवरूख येथे मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट २०१७ पासून चालवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शिक्षणसंस्थेच्या विनंतीनुसार, पतपेढीने ५ लाखांची देणगी जाहीर केली. पतपेढी अध्यक्ष अविनाश शांताराम लाड यांनी २ मे रोजी या देणगीचा चेक शिक्षणसंस्थेचे सरचिटणीस शांताराम गोरूले यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी पतपेढी उपाध्यक्ष शांताराम सालप, सीईओ प्रकाश आगरे, संचालक पांडुरंग खाडे, वैशाली गिडये, वैभव तावडे, आत्माराम भुरावने, कुणबी समाजोन्नती संघ कार्यकारिणी सदस्य सुरेश कानाल आणि कुणबी बँक संचालक पी. डी. ठोंबरे आदी उपस्थित होते.

००२२८
आरसी काळे माध्यमिक विद्यालय महाराष्ट्र दिन
चिपळूण ः पेढे परशुराम येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयात ६४वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहन शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. मुख्याध्यापक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची बाब स्पष्ट करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्राने देशाला कसे घडवले आहे आणि देशाला प्रगतीचा विचार कसा दिला यावर भाष्य केले. या वेळी सिद्धी मोरे या विद्यार्थिनीला एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल आणि विद्यालयाचा माजी विद्यार्थी शंतनू चव्हाण यांनी घरडा कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये केमिकल इंजिनिअरिंग पदवी परीक्षेत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्याचा अध्यक्ष अभय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

००२२४
संचालक अवेरेंचा मंडणगडात सत्कार
मंडणगड ः मंडणगड तालुका विकास मंडळ मुंबई संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगडमध्ये क्रीडा शिक्षक संजय अवेरे यांची रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले. त्यानिमित्ताने त्यांचा संस्था व शाळेच्या वतीने सत्कार केला. या वेळी उपाध्यक्ष रमेश दळवी, सदस्य व राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष संतोष मांढरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार, मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील, अर्जुन हुल्लोळी, शांताराम बैकर, मुख्याध्यापक शेडगे उपस्थित होते. मागील १५ वर्षाच्या कालावधीनंतर लोकशाही पॅनेल निवडून आले आहे. गेली ३५ वर्ष पतसंस्था कार्यरत आहे. त्यामध्ये टीडीएफ, कास्ट्राईब, शिक्षकेतर कर्मचारी, उर्दू शिक्षक संघटना या एकत्रित लढल्याने हे यश मिळाल्याचे सुनील घोसाळकर यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना अवेरे यांनी कोणालाही दोष लागणार नाही अशाप्रकारे माझ्या हातून काम होणार याची ग्वाही देतो, असे सांगितले.


एसटी बसच्या टपावर सापाचा मुक्काम
खेड ः खेड बसस्थानकात एसटीच्या टपावर एका सापाचा मुक्काम आढळल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. खेड बसस्थानकामध्ये खेड ते किल्ले माची या बसच्या टपावर हरण टोळ म्हणजेच टाळू फोड्या जातीचा हा विषारी हिरव्या रंगाचा साप थेट एसटीच्या टपावर असल्याचे लक्षात आले. प्रवाशांनी ओरडा करत बसस्थानकातील नियंत्रण कक्षात धाव घेतली. त्यानंतर सर्प मित्रांना बोलावण्यात आले व त्या विषारी सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सुट्ट्या असल्याने बसस्थानकात मोठी गर्दी झाली. ग्रामीण भागात घनदाट झाडीमध्ये कदाचित झाडावरून एसटीच्या टपावर हा विषारी साप पडला असावा असा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com