ग्रामपंचातीला गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचातीला गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार
ग्रामपंचातीला गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार

ग्रामपंचातीला गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार

sakal_logo
By

१६ (पान २ साठी)


-rat३p१४.jpg ः
२३M००२०९
सावर्डे ः मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक स्वीकारताना सरपंच समीक्षा बागवे, सदस्य अजित कोकाटे, अंकिता सावंत, सचिन बागवे.
---
सावर्डे ग्रामपंचायतीला पुरस्कार

सावर्डे, ता. ४ ः सावर्डे ग्रामपंचायतीला २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षाचा संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळवला आहे. सावर्डे ग्रामपंचायतीला प्रशस्तीपत्रक व ५० हजार रोख रक्कम देऊन शासनाकडून गौरवण्यात आले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते सरपंच समीक्षा बागवे, सदस्य अजित कोकाटे, अंकिता सावंत, सचिन बागवे यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान झाला. सावर्डे जिल्हा परिषद गटातील सावर्डे, कुडप, कोंडमळा, मांडकी, ढोक्रवली, खरवते, ओमळी, आगवे, दहीवली खुर्द व बुद्रुक या ११ ग्रामपंचायतींमधून सावर्डे ग्रामपंचायतीला स्वच्छता अभियान स्पर्धेत चांगले काम केल्याबदल हा पुरस्कार देण्यात आला. दोन्ही वर्षाचा प्रथम क्रमांक सावर्डे ग्रामपंचायतीला मिळल्याबद्दल तालुक्याचे आमदार शेखर निकम सावर्डे, माजी सभापती पूजा निकम, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उद्योजक सचिन पाकळे, केतन पवार, संजय पाकळे, मारूती चव्हाण, यशवंतराव चव्हाण, सूर्यकांत चव्हाणसह ग्रामस्थांनी सावर्डेचे सरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्ला व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.