ःमहिला कबड्डी स्पर्धेत वेतोशीचे मित्रप्रेम संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ःमहिला कबड्डी स्पर्धेत वेतोशीचे मित्रप्रेम संघ विजेता
ःमहिला कबड्डी स्पर्धेत वेतोशीचे मित्रप्रेम संघ विजेता

ःमहिला कबड्डी स्पर्धेत वेतोशीचे मित्रप्रेम संघ विजेता

sakal_logo
By

३० (पान ५ साठी)

-rat३p३१.jpg ः
२३M००३१८
राजापूर ः विजेत्या संघाला गौरवताना तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, भाजपा महिला जिल्हा मोर्चाच्या सरचिटणीस शिल्पा मराठे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा श्रुती ताम्हणकर आणि मान्यवर.
---

महिला कबड्डी स्पर्धेत वेतोशीचे मित्रप्रेम संघ विजेता

राजापूर, ता. ३ ः राजापूर तालुका व रत्नागिरी कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भाजपा महिला मोर्चा आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान राजापूर आयोजित बाधकाममंत्री रवींद्र चव्हाण प्रायोजित जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत अंतिम लढतीत पानवल (अ) रत्नागिरी संघाला १ गुणाने मात करत मित्रप्रेम वेतोशी (लांजा) संघाने विजेतेपद पटकावले. पानवल (अ) संघाला उपविजेते तर शिवमुद्रा राजापूर (अ) व रामेश्वर गावखडी संघांनी संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या, उपविजेत्या आणि तृतीय विजेत्या संघांना आकर्षक चषक आणि बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
येथील राजापूर हायस्कूल क्रीडांगणावर भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा श्रुती ताम्हणकर व जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस शिल्पा मराठे यांच्या प्रयत्नाने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस शिल्पा मराठे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष श्रुती ताम्हणकर, उपाध्यक्षा शीतल रहाटे, तालुका सरचिटणीस मोहन घुमे, शहराध्यक्ष विवेक गुरव, महिला शहराध्यक्षा सोनाली केळकर, ओबीसी महिला तालुका सरचिटणीस रेणुका गुंड्ये आदी उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील १२ संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा आरंभ भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा ऐश्वर्या जठार यांच्या हस्ते करण्यात आला होता. स्पर्धेतील उगवता तारा म्हणून वेदिका वारिक (शिवमुद्रा राजापूर), सामनावीर म्हणून सानिका खोचरे (वेतोशी), उत्कृष्ट पक्क्ड दीपाली धनावडे (वेतोशी), मालिकावीर म्हणून नंदिनी खोचरे (वेतोशी), तर उत्कृष्ट चढाईसाठी प्रणिता मांजलकर (पानवल अ) यांना मान्यवरांच्या हस्ते वैयक्तिक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.