कशेडी घाटात मोटार पेटली

कशेडी घाटात मोटार पेटली

पान ३ साठी
००३२०

बर्निंग कारचा
कशेडी घाटात थरार
खेड, ता. ३ ः मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात आज (ता. ३) रोजी दुपारी १२.२३ वा. मुंबईच्या दिशेने जाणारी मोटारीने अचानक पेट घेतला. प्रवासी वेळेत खाली उतरल्याने अनर्थ टळला असला तरी मोटारीचे नुकसान झाले आहे. कशेडी घाट स्वामी समर्थ मठाच्या खालील बाजूस मुंबई-गोवा महामार्गावर आज दुपारी गणपतीपुळे ते मुंबई कोपरखैरणे सेक्टर-१० येथे निघालेली मोटारीच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. मोटारमालक विष्णू सर्जेराव गरजे (रा. नवी मुंबई कोपरखैरणे) हे पत्नी प्रतिभा विष्णू गरजे व अन्य ८ जण यावेळी मोटारीतून प्रवास करत होते. बोनेटमधून धूर येऊ लागला म्हणून गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन सर्व माणसे गाडीतून उतरून बाजूला झाली. त्याचवेळी गाडीने पेट घेतला व संपूर्ण कार आगीमध्ये जळून खाक झाली. आगीमध्ये गाडीचे शंभर टक्के नुकसान झाले असून जीवितहानी झाली नाही. खेड पालिकेचे अग्निशमन दल यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com