भाजप कार्यकर्त्यांना कल्पनाच नाही

भाजप कार्यकर्त्यांना कल्पनाच नाही

३५ (पान ५ साठी)

भूमिपूजनाची भाजप कार्यकर्त्यांना माहिती नाही

मकरंद म्हादलेकर ः प्रदेशाध्यक्षांसह उपमुख्यमंत्रांकडे तक्रार करणार

दाभोळ, ता. ३ ः स्वतःला कार्यसम्राट म्हणवणारे आमदार योगेश कदम हे सवंग प्रसिद्धीसाठी व श्रेयासाठी भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय व निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन दापोली तालुक्यात करत आहेत. या वेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला वा पदाधिकाऱ्याला याची कल्पनाही दिली नाही. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी दिली आहे.
म्हादलेकर म्हणाले, २०२२-२३ च्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पात दापोली तालुक्यातील अनेक विकासकामे ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व विधान परिषदेतील आमदार श्रीकांत भारतीय यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचवण्यात आली होती. तसे पत्रही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले होते. ही कामे अर्थसंकल्पात मंजूरही झाली आहेत. त्यातील दापोली तालुक्यातील केळशी-मांदिवली-देव्हारे रस्ता ०.८०० ते १.२०० यामध्ये सुधारणा करणे या कामासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार योगेश कदम यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन केले. या वेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला वा पदाधिकाऱ्याला याची कल्पनाही दिली नाही. भूमिपूजन कार्यक्रमालाही बोलावले नाही. केळशी ग्रामपंचायतीत भारतीय जनता पार्टीचे सरपंच असूनसुद्धा त्यांनाही या भूमिपूजनाचे निमंत्रण दिले गेलेले नाही.
केंद्र शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी नळाद्वारे मिळावे, यासाठी जलजीवन मिशन ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत दापोली तालुक्यात १७० वाड्यावस्त्यांमध्ये जवळजवळ दीडशे कोटी इतक्या निधीची कामे सुरू आहेत. कार्यक्रमासाठी आमदार योगेश कदम कोणत्याही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याला विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात प्रचंड नाराजी असून याबाबत जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या माध्यमातून याबाबतची तक्रार प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे.
------
आम्ही निमंत्रण दिले होते

दापोली तालुक्यातील दाभोळ ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन या खात्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते दाभोळ येथे करण्यात आले. या वेळी आमदार कदम यांना निमंत्रित करण्यात आले होते. या उलट आमदार कदम यांना भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कार्यक्रमाला बोलावण्यास कोणता कमीपणा वाटतो, असा सवाल म्हादलेकर यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com