बुरोंडीतील घरातून 2 लाख 62 हजाराचा मुद्देमाल चोरीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुरोंडीतील घरातून 2 लाख 62 हजाराचा मुद्देमाल चोरीस
बुरोंडीतील घरातून 2 लाख 62 हजाराचा मुद्देमाल चोरीस

बुरोंडीतील घरातून 2 लाख 62 हजाराचा मुद्देमाल चोरीस

sakal_logo
By

३८ (पान ३ साठी)

बुरोंडीत अडीच लाखाची चोरी

दाभोळ, ता. ३ ः दापोली तालुक्यातील बुरोंडी बाजारपेठ येथील घरातून २ लाख ६२ हजाराचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुरोंडी बाजारपेठ येथील साधना शिरगांवकर या २ मे रोजी सकाळी मासे विक्रीसाठी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. त्यांनी घराची किल्ली दरवाजाच्या बाजूला असलेल्या विजेच्या बोर्डवर ठेवली होती, अज्ञात चोरट्याने ती किल्ली घेऊन कुलूप उघडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातील कपड्यामध्ये ठेवलेली लॉकरची किल्ली घेऊन लॉकर उघडले. त्यामधील सोन्याच्या चेन, कानातील झुमके, कानातील कुडी, अंगठी असे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ९ हजार ५०० असा एकूण २ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. शिरगांवकर सायंकाळी घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोणीतरी माहितगार व्यक्तीनेच ही चोरी केली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. दापोली पोलिस ठाण्यात त्यांनी चोरीची तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विलास पड्याळ करत आहेत.