पर्यटकाच्या सुरक्षेसाठी बीच वॉर्डन

पर्यटकाच्या सुरक्षेसाठी बीच वॉर्डन

पर्यटकाच्या सुरक्षेसाठी बीच वॉर्डन
अलिबाग ः समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आता किनारी भागात बीच वॉर्डनची नियुक्ती करण्यात येणार असल्‍याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. पोलिस, मत्स्य विभाग, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड व स्थानिक प्रशासनाच्या मदतीला हे वॉर्डन असतील.
रायगडला विस्‍तीर्ण किनारा लाभला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक जिल्‍ह्यात येतात. त्यात अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, मांडवा, किहीम, रेवदंडा, थेरोंडा, काशीद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर ही १३ किनारे पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरतात. मात्र अनेकदा भरती ओहोटीचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडतात. याशिवाय साहसी खेळादरम्‍यान अपघात होणे. वाहन पार्किंग समस्या, किनाऱ्यावर सीसी टीव्ही नसणे आदी कारणांमुळे पर्यटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com