दशावतार नाट्यमहोत्सवाचे
कारिवडे येथे उद्‍घाटन

दशावतार नाट्यमहोत्सवाचे कारिवडे येथे उद्‍घाटन

00374
कारिवडे ः दशावतार नाट्यमहोत्सव उद्‍घाटन प्रसंगी विठ्ठल परब, नितीन गावडे आदी.

दशावतार नाट्यमहोत्सवाचे
कारिवडे येथे उद्‍घाटन
ओटवणे, ता. ३ ः कारिवडे येथील श्री देव हेळेकर मंडळ आयोजित दशावतार नाट्यमहोत्सवाचे उद्‍घाटन कारिवडे सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर उपसरपंच नितीन गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले.
या दशावतार नाट्यमहोत्सवात उद्या (ता. ४) आजगावकर दशावतार नाट्यमंडळ (आजगाव) यांचा ‘शिर मारीले आईचे’, शुक्रवारी जय संतोषी माता दशावतार नाट्यमंडळाचा (मातोंड) ‘शापित घुबड’, शनिवारी बोर्डेकर दशावतार नाट्यमंडळाचा (दोडामार्ग) ‘देव भक्तीला भुकेला’ ही नाटके सादर केली जाणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी कारिवडे सोसायटीचे चेअरमन महादेव माळकर, पोलिसपाटील प्रदीप केळुसकर, महादेव माळकर, मंडळाचे अध्यक्ष गोविंद परब, अनंत झिडगे, दशरथ माळकर,‌‌ परशुराम पालव, विजय माळकर, तानाजी माळकर, रामचंद्र शिंदे, सोमा राऊळ आदी उपस्थित होते. पाच दिवस चालणाऱ्या या दशावतार नाट्यमहोत्सवाची सांगता शनिवारी (ता. ६) होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com