देवगडमध्ये अंतिम दिवशी 
सात जणांचे उमेदवारी अर्ज

देवगडमध्ये अंतिम दिवशी सात जणांचे उमेदवारी अर्ज

देवगडमध्ये अंतिम दिवशी
सात जणांचे उमेदवारी अर्ज

ग्रामपंचायत पोटनिवडणूक; पाच ठिकाणी प्रत्येकी एकच अर्ज

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीसाठीच्या जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यातील पडेल वगळता उर्वरित पाच ठिकाणी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्या जागा बिनविरोध ठरणार आहेत. येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, विजयदूर्ग आणि ठाकूरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीही अर्ज आले नसल्याने त्या जागा रिक्त राहणार आहेत.
तालुक्यातील कुवळे, हडपीड, मणचे, पडेल, आरे, ठाकूरवाडी, गवाणे, गोवळ, कोटकामते, मुटाट, कातवण, सांडवे, कुणकवण, ओंबळ, पेंढरी, विजयदुर्ग आणि मळेगाव अशा एकूण १७ ग्रामपंचायतीसाठीचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यातील विजयदुर्ग आणि ठाकूरवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या जागासाठीही निवडणूक जाहीर झाली होती. ठाकूरवाडीमध्ये सरपंच आणि एक सदस्य जागा रिक्त आहे. तसेच ओंबळ आणि गोवळ या दोन ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी दोन जागा तसेच आणि उर्वरित ठिकाणी एक जागा रिक्त असल्याने एकूण १७ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या १९ सदस्य जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत केवळ सातच अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये कोटकामते, मुटाट, कातवण, कुणकवण, मळेगाव येथे प्रत्येकी एक असे पाच अर्ज तर पडेलमध्ये एका सदस्य जागेसाठी दोन अर्ज आले आहेत. तर उर्वरीत ११ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याने त्या ठिकाणच्या जागा रिक्त राहणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, सोमवारी (ता.८) दुपारी तीनपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com