खेड ः खेड न्यायालयाने आरोपीला ठोठावली फाशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः खेड न्यायालयाने आरोपीला ठोठावली फाशी
खेड ः खेड न्यायालयाने आरोपीला ठोठावली फाशी

खेड ः खेड न्यायालयाने आरोपीला ठोठावली फाशी

sakal_logo
By

पान १ साठी

००३५८
सूर्यकांत नवनाथ चव्हाण
००३५९
अॅड. पुष्कराज शेट्ये


बलात्कार, खून करणाऱ्या
तरुणाला फाशीची शिक्षा
खेड न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

सकाळ वृत्तसेवा
खेड (जि. रत्नागिरी), ता. ३ ः तालुक्यातील एका शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून निर्घृणपणे खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. बुधवारी (ता. ३) हा निकाल दिला. निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय २९) असे फाशी ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी वकील पुष्कराज शेट्ये यांनी या खटल्यात युक्तिवाद केला.
तालुक्यातील अल्पवयीन मुलगी १९ जुलै २०१८ ला शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. २० जुलै २०१८ ला अल्पवयीन मुलीचा डोक्याचा पट्टा गावातील एकाच्या घराजवळ सापडला. त्यानंतर ग्रामस्थ व तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल गंभीर व सहायक निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी सूर्यकांत चव्हाण याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली देत मृतदेह कुठे लपवला आहे, याची माहिती दिली. खेड पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दखल केला. त्यानंतर आरोपपत्र दाखल केले. आरोपी सूर्यकांत याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग १ डी. एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशी व दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने २८ एप्रिल २०२३ ला चव्हाणला दोषी ठरवले होते. बुधवारी त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. सरकार पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी वकील पुष्कराज शेट्ये यांनी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याचे दाखले दिले. सरकार पक्षातर्फे २८ साक्षीदार तपासले. सरकारी वकील पुष्कराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद महत्त्वाचा ठरला. तत्कालिन पोलिस निरीक्षक गंभीर, पोलिस निरीक्षक अनिल लाड, एपीआय गदडे, पीएसआय सोनावळे, पैरवी अधिकारी सूरज माने, राम नागुलवार यांनी तपासकामात मदत केली.
वकिली जीवन सार्थ झाले
अल्पवयीन बालिकेविरोधात गुन्हा करणाऱ्या नराधमांना कठोर संदेश देणारा हा निर्णय आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात सुमारे ४५ वर्षांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेड न्यायालयाची नवीन इमारत झाल्यापासून अशा प्रकारचा निकाल पहिल्यांदाच आला आहे. मृत बालिकेला न्याय मिळाला असल्याने वकिली जीवन सार्थकी लागल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी व्यक्त केली.