
विद्यार्थी निर्मित अभिव्यक्ती पुस्तकांचे बांद्यात प्रकाशन
swt43.jpg
00432
बांदाः विद्यार्थी निर्मित पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव रणजित सिंह देओल, सीईओ प्रजित नायर व अन्य.
विद्यार्थी निर्मित अभिव्यक्ती
पुस्तकांचे बांद्यात प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः वेर्ले शाळा नं. ३ आणि शिरशिंगे-मळई शाळेतील विद्यार्थी निर्मित ‘उमलते भावसंवेदन’ आणि ‘कोरोना लॉकडाऊनः एक जीवनानुभव’ या अभिव्यक्ती पुस्तकांचे प्रकाशन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत बांदा येथे करण्यात आले.
यावेळी राज्याचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक केदार पगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, डाएट प्रा. अनुपमा तावशीकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, तहसीलदार अरुण उंडे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस म. ल. देसाई आदी उपस्थित होते.
‘आपण सारे अभिव्यक्त होऊया’ या शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थांनी स्वानुभव कथन करून त्याला कथेचे स्वरूप आणावे, यासाठी प्राथमिक शिक्षक मनोहर परब यांनी मुलांना आवांतर वाचनाची सवय लावली. यातूनच मुलांमध्ये सुंदर साहित्य कलाकृती सकसपणे विकसित झाली. शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्शवत ठरणाऱ्या या पुस्तिकेची निर्मिती केल्याबद्दल विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक शिक्षक परब यांचा शिक्षणमंत्री केसरकर आणि प्रधान सचिव देओल यांनी सन्मान करून कौतुक केले. परब यांनी यापूर्वीही मुलांच्या काव्यसंग्रहाचे संपादन केले आहे.