पालकमंत्री रवींद्र चव्हाण सावंतवाडीसाठी ''विकासपुरुष''

पालकमंत्री रवींद्र चव्हाण सावंतवाडीसाठी ''विकासपुरुष''

swt४४.jpg
M००४३३
बंटी पुरोहित

पालकमंत्री रवींद्र चव्हाण
सावंतवाडीसाठी ‘विकासपुरुष’
बंटी पुरोहितः अनेक प्रकल्प मार्गी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः येथील शहरात गेली अनेक वर्षे रेंगाळलेल्या प्रकल्पांना कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून देणारे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सावंतवाडीकरांसाठी विकासपुरुष ठरले आहेत. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हे प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत. यापुढेही त्यांनी शहरावर असेच प्रेम करावे, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी बंटी पुरोहित यांनी केली.
सावंतवाडी शहरासाठी महत्त्वपूर्ण अशा प्रस्तावित नळपाणी योजनेसाठी ५६ कोटी, भाजी मंडईसाठी १३ कोटी आणि आधुनिक अग्निशमन यंत्रणेसाठी पालकमंत्र्यांनी साडेतीन कोटी रुपयांचा निधी अवघ्या आठ महिन्यांत उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे रेंगाळलेले प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत. त्यामुळे शहराच्या विकासात आता भर पडणार आहे. शहरातील पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाळणेकोंड धरणावरून नवीन योजना प्रस्तावित होती. गेली चार वर्षे यासाठी आवश्यक निधी नसल्याने ही योजना रखडली होती; मात्र यासाठीही तब्बल ५६ कोटी रुपये मंजूर करून पालकमंत्र्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे कोट्यवधीचा निधी देणाऱ्या पालकमंत्र्यांचे आम्ही आभार मानतो, असे पुरोहित यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com