श्री भवानी वर्धापनदिन डिगस येथे उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री भवानी वर्धापनदिन डिगस येथे उत्साहात
श्री भवानी वर्धापनदिन डिगस येथे उत्साहात

श्री भवानी वर्धापनदिन डिगस येथे उत्साहात

sakal_logo
By

swt48.jpg
00438
डिगस : सुर्वेवाडी येथील दशावतारी नाटकातील क्षण.

श्री भवानी वर्धापनदिन
डिगस येथे उत्साहात
कुडाळ, ता. ४ः डिगस-सुर्वेवाडी येथील श्री भवानी माता मंदिर येथे सोमवारी वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी झाली होती. यानिमित्त जयभवानी उत्कर्ष मंडळ, मुंबई व जय भवानी प्रासादिक भजन मंडळ, डिगस (सुर्वेवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी श्रींची महापूजा, महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी लहान मुलांचे कार्यक्रम, स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्री नाईक दशावतार नाट्यमंडळ (झरेबांबर दोडामार्ग) यांचा ‘कुंडभैरव’ हा नाट्यप्रयोग सादर झाला.
..................
महामार्ग कामास गती
येण्यासाठी दुचाकी रॅली
सावंतवाडी, ता. ४ः मुंबई-गोवा महामार्ग मेपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले; परंतु प्रत्यक्ष पाहणीनंतर हे काम संथगतीने सुरू असून शासन-प्रशासनाला जाग येण्यासाठी रविवारी (ता. ७) सायंकाळी ४ वाजता कामोठे टोल प्लाझा ते खारपाडा टोल प्लाझा अशा १७ किलोमीटर दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. खारपाडा येथे सभा घेऊन सांगता करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या दादर येथे झालेल्या निर्धार सभेत हा निर्णय घेण्यात आला. यात रायगड मी मराठी प्रतिष्ठान, कोकण विकास युवा मंच, कोकण विकास समिती, कोकण कृती समिती, गवळी समाज सेवा, रायगड स्वराज्य संघटना मुंबई, स्वराज्य संघटना रायगड, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ, कोकण प्रतिष्ठान दिवा, कोकण युवा संस्था, पनवेल एम. आर. असोसिएशन, पेण एम. आर. असोसिएशन यांचा समावेश आहे.
...............