रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

मध्य रेल्वेच्या कोकणासाठी २६ उन्हाळी विशेष फेऱ्या
रत्नागिरी ः सुट्टीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीदरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मध्यरेल्वेने याआधीच ९१६ उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याची घोषणा केली असून, या २६ अतिरिक्त गाड्यांसह यंदा उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या ९४२ होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ मे ते ३ जूनपर्यंत दर शनिवारी, सोमवारी आणि बुधवारी ही गाडी चालवण्यात येणार आहे. ही गाडी एलटीटीवरून २२.१५ वा. सुटेल आणि थिवीला दुसऱ्या दिवशी ११.३० ला पोहोचेल. थिवी येथून दूसऱ्या दिवशी सायं. ४.४० ला सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ४.०५ ला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबेल. या गाडीच्या आरक्षणासाठी www.irctc.co.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.


गणेशगुळेत सोमवारी मोफत नेत्रतपासणी
पावस ः येथील इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल व ग्रामपंचायत गणेशगुळे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी (ता. ८) मे रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात सर्वंकष मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डोळ्यांचा अंतर्भाग व बाह्यभाग तपासणी, इंट्राऑनक्युलर प्रेशरची मोजणी, डोळ्यांच्या पडद्याची तपासणी, मोतीबिंदू व काचबिंदूचे परीक्षण, चष्म्याचा अचूक नंबर व कॉम्प्युटर वापरामुळे होणाऱ्या परिणामांची तपासणी आदी तपासण्या केल्या जाणार आहेत. जास्तीत जास्त जणांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी सरपंच श्रावणी रांगणकर यांच्याशी साधावा.

पेढांबेत सोमवारी बैलगाडी स्पर्धा
चिपळूण : चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ८ मे रोजी सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत तालुक्यातील पेढांबे भराडेवाडी येथे कोकण सह्याद्री हिंद केसरी आमदार चषक २०२३ राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण गुहागर तालुका बैलगाडी शर्यत असोसिएशन व सर्व जमिन मालकांचे या स्पर्धेला सहकार्य लाभणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम देण्यात येणार आहे. ७ मे रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत स्पर्धेचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी रोहित राणे, प्रज्योत पवार, अमित जाधव, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, चिपळूण येथे संपर्क साधावा.