रत्नागिरी ः फुटपाथ व्यावसायिकांविरोधात व्यापाऱ्यांचा संघर्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः फुटपाथ व्यावसायिकांविरोधात व्यापाऱ्यांचा संघर्ष
रत्नागिरी ः फुटपाथ व्यावसायिकांविरोधात व्यापाऱ्यांचा संघर्ष

रत्नागिरी ः फुटपाथ व्यावसायिकांविरोधात व्यापाऱ्यांचा संघर्ष

sakal_logo
By

rat049.txt

बातमी क्र. . 9 ( ग्राफीक पद्धतीने घ्यावे.)

फोटो ओळी
-rat4p14.jpg- KOP23M00444 रत्नागिरी ः जेलरोड जवळील फुटपाथवर आंबा, फळ तसेच कलिंगड व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.
-rat4p15.jpg-KOP23M00445 जिल्हा परिषदेजवळील फुटपाथवर असलेले ज्युस सेंटर.
-rat4p16.jpg-KOP23M00446 आठवडा बाजारात रस्त्यावर डेरा घालून बसलेले फळविक्रते.
----------
फुटपाथ व्यावसायिकांविरोधात व्यापाऱ्यांचा संघर्ष

पालिकेने दिला कारवाईचा इशारा ; राजकीय आशीर्वादातून दहशत

इंट्रो...

रत्नागिरी ः शहरात फेरीवाले तसेच फुटपाथवर बसणाऱ्या व्यावसायिक विरुद्ध स्थानिक व्यापारी असा नवा वाद चिघळला आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी शहरातील फुटपाथवर बेकायदशीर ठेला टाकला आहे. फेरीवाल्यांनी जागा निश्चित करून बस्तान मांडले आहे. याला राजकीय आशीर्वाद असल्याने त्यांच्या म्होरक्याची शहरात दहशत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यापारावर याचा मोठा विपरित परिणाम झाल्याचा आक्षेप शहर व्यापारी महासंघाने घेतला आहे. याबाबत काही फेरीवाल्यांशी वाद झाल्यामुळे फेरीवाल्यांचा म्होरक्याविरुद्ध व्यापारी संघाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे, तर फुटपाथवर बेकायदेशीर डेरा टाकणाऱ्यांना दोन दिवसात फुटपाथ रिकामे करा अन्यथा कारवाई केली जाईल, अशी इशारावजा सूचना पालिकेने ध्वनीक्षेपकावरून दिल्या आहेत.
----------------

फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी

रत्नागिरी शहरामध्ये फेरीवाले आणि फुटपाथवर बसणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांबाबत कोणतेही धोरण निश्चित नाही. नोंदणीकृत फेरीवाले किती आणि अनधिकृत किती याचा कोणताही ताळमेळ नाही. ज्या फेरीवाल्यांना पालिकेने परवानगी दिली आहे, त्यांनी एका ठिकाणी न थांबता शहरात फिरत राहायचे आहे; परंतु सर्व फेरीवाऱ्यांनी अलिखित जागा निश्चित केल्या असून तेथे ते डेरा घालून असतात. त्यांच्या जागेवर दुसरा कोणी आला तर ते थेट वाद घालायला तयार होतात. त्यामुळे रत्नागिरीत फेरीवाल्यांचीच चलती असल्याचे दिसते. पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला याची कल्पना नाही, असेही नाही. त्यांना सर्व माहिती असले तरी राजकीय वरदहस्त असल्याने त्यांनाही याकडे डोळेझाक करावे लागत आहे; मात्र त्यामुळे फेरीवाले अधिक निर्ढावल्याचा आरोप व्यापाऱ्यांचा आहे. शहरातील अर्ध्या रस्त्यामध्ये फेरीवाले आपली गाडी लावून बसतात. त्याच्यापुढे गिऱ्हाईक येऊन थांबते. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते. पोलिस पालिकेने कोंडी सोडवण्यासाठी पट्टेही मारून दिले आहेत; परंतु फेरीवाले त्यालाही फाटा देत स्थानिक व्यापारी असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्याचा अतिरेक झाल्याचा आरोप व्यापारी महासंघाने केला आहे.
---------
फुटपाथवर व्यवसाय
स्थानिक व्यापाऱ्यांवर दुसरे संकट आहे ते परजिल्ह्यातून येऊन फुटपाथवर बेकायदेशीर डेरा टाकायचा आणि आपला व्यवसाय करायचा, असा नवा फंडा आता सुरू झाला आहे. कांदाविक्री, आंबा, कलिंगड विक्री, शितपेय त्यानंतर मोठमोठे कोच व इतर वस्तूही विक्रीला ठेवल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहक येता-जाता यांच्याकडून माल खरेदी करतात. स्थानिक बाजारपेठेकडे फिरकत नाहीत, याचा स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यापारावर मोठा विपरित परिणाम होत आहे. अशा तक्रारी शहर व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे यापूर्वी केल्या आहेत. याबाबत व्यापारी आक्रमक झाले असून, कायदेशीर कारवाईला त्यांनी सुरवात केली आहे. पालिका प्रशासनानेही याची दखल घेऊन फुटपाथवर बेकायदेशीर बसणाऱ्या व्यापाऱ्यांना फुटपाथ रिकामे करण्याचा इशारा दिला आहे.
------------

फेरीवाल्यांच्या म्होरक्याची दहशत, पोलिसांत तक्रार
बाजारपेठेत अनधिकृतपणे रस्त्यावर बसून विविध प्रकारचा माल विकणाऱ्या फेरीवाल्यांमुळे स्थानिक बाजारातील व्यापाऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. काही राजकीय व्यक्ती मतांसाठी या अशा अनधिकृत फेरीवाल्यांच्या पाठीशी असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाकडून अशा फेरीवाल्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लेखी निवेदन दिल्यावर या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पालिकेला दिले आहेत. यानुसार कारवाई होत असताना आता फेरीवाल्यांचे म्होरके दादागिरी करायला पुढे आले आहेत. एका म्होरक्याने तर बाजारपेठेत येऊन व्यापाऱ्यांना शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रकार केला आहे. याबाबत आज राम आळी येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अशा गावगुंडांचा पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त करावा, अशी विनंती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी प्रशासनाला केली आहे.

कोट...
शहर व्यापारी महासंघाने तक्रार केल्यानंतर आम्ही कालपासूनच शहरात बेकायदेशीर फूटपाथवर बसणाऱ्या व्यापाऱ्यांना हटवले आहे तसेच बाजारपेठेत जे फेरीवाले फेऱ्या न मारता जागेवर थांबून व्यवसाय करत आहेत त्यांच्यावरही कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई सुरू राहणार असून कोणाचीही गय केली जाणार नाही.
-तुषार बाबर, मुख्याधिकारी तथा प्रशासक, रत्नागिरी पालिका