तळकट शाळेत आजपासून शतक महोत्सव सोहळा

तळकट शाळेत आजपासून शतक महोत्सव सोहळा

तळकट शाळेत आजपासून
शतक महोत्सव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः तळकट (ता.दोडामार्ग) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळकट क्रमांक १ चा शतक महोत्सव सोहळा ५ ते ७ मे या कालावधीत होणार आहे. शतक महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या (ता.५) शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. ७ ला खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शतक महोत्सव सांगता समारोप होणार आहे.
होणारे कार्यक्रम असेः उद्या (ता.५) दुपारी ३ वाजता शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन, स्मरणिका प्रकाशन आणि माजी शिक्षक सत्कार सोहळा, रात्री १० वाजता माजी विद्यार्थी विविध कार्यक्रम, ६ ला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती, सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर, दुपारी ३ वाजता बांदा येथील मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर, डॉ. अनिकेत गवस (सहा.अभि श्रेणी २), रात्री १० वाजता ग्रामसेवा मंडळ तळकट कट्टा, मुंबई यांचा सामाजिक नाट्यप्रयोग (माझ्या मना), ७ ला खासदार विनायक राऊत यांची उपस्थिती, दुपारी ३ वाजता व्याख्यान डॉ. प्रसाद देवधर, कुडाळ (प्रगत बागायती शेती) मिळुनी साऱ्या जणी (महिला तळकट कट्टा), रात्री १० वाजता माजी विद्यार्थीनी शाळा तळकट क्रमांक १ यांचा दशावतार नाट्यप्रयोग-विष्णुमहिमा, ८ ला रात्री १०.३० वाजता रंजनकला नाट्यमंडळ तळकट कट्टा यांचा सामाजिक नाट्यप्रयोग-सासरच्या अंगणी यावेळी आजी-माजी विद्यार्थी शिक्षक पालक ग्रामस्थ तसेच नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शतक महोत्सव समिती, ग्रामस्थ तळकट कट्टा आणि ग्रामसेवा मंडळ तळकट कट्टा मुंबई यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com