मसुरे-देऊळवाडा सरपंचपदी वायंगणकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसुरे-देऊळवाडा सरपंचपदी वायंगणकर
मसुरे-देऊळवाडा सरपंचपदी वायंगणकर

मसुरे-देऊळवाडा सरपंचपदी वायंगणकर

sakal_logo
By

swt418.jpg
00497
मसुरेः निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत सावंत यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल करताना सुचिता वायंगणकर. सोबत सदस्य अशोक मसूरकर व ग्रामस्थ.

मसुरे-देऊळवाडा सरपंचपदी वायंगणकर
बिनविरोध निवडः नवनिर्मित ग्रामपंचायतीचा जिल्ह्यात आदर्श
मालवण, ता. ४ : मसुरे देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुचिता वायंगणकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
मसुरे गावचे विभाजन होऊन चार वर्षांपूर्वी देऊळवाडा ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन कोणत्याही पक्षीय बलाची जोड न घेता बिनविरोध ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांची निवड श्री देव जैन भरतेश्र्वर ग्राम विकास पॅनलच्या नावाखाली केली होती. त्यावेळी सरपंचपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे प्रत्येकी अडीच वर्षांचा कालखंड सर्वानुमते नेमून दिला होता. त्याप्रमाणे अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये नवनिर्वाचित सरपंच म्हणून सुचिता वायंगणकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी (ता. २) पंचायत समिती येथे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत सावंत यांच्याकडे सुचिता वायंगणकर यांचे सरपंचपदासाठी देऊळवाडा ग्रामस्थांच्या सर्वानुमते एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्याची छाननी होऊन तो अर्ज कायम करण्यात आला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींवर राजकीय पक्षांमार्फत किंवा स्थानिक संघटनांमार्फत सरपंचपदासाठी निवडणुका लढविल्या जातात; परंतु देऊळवाडा ग्रामपंचायत विभाजन होऊनही या गावात असलेले सर्व जाती धर्माचे, राजकीय विचारांचे लोक एकत्र येऊन कोणत्याही प्रकारची निवडणूक न लढविता सर्वानुमते पुन्हा एकदा बिनविरोध सरपंच निवडला. नवीनच असलेल्या या ग्रामपंचायतीने बिनविरोध सरपंच निवडून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे.