आठल्ये-सप्रेने नवे शैक्षणिक धोरण स्विकारला

आठल्ये-सप्रेने नवे शैक्षणिक धोरण स्विकारला

rat०४१७.txt
१७ (टूडे २ साठी)


- rat४p७.jpg-
२३M००४५२
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकृत
----------

आठल्ये-सप्रेने नवे शैक्षणिक धोरण स्वीकारला

सभेमध्ये चर्चा ः विषयांचे विकल्प विद्यार्थ्यांना खुले

साडवली, ता. ४ ः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि श्रेयांक आराखडा महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार २०२३-२४ पासून महाराष्ट्रामध्ये लागू करणार असल्याचे जाहीर केले. शैक्षणिक धोरणाचा आराखडा आणि प्रारूप याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यासाठी महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या आर. डी. कुलकर्णी समितीचा अहवालावर सर्वसमावेशक चर्चा करून देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे (स्वायत्त) महाविद्यालयाने २९ एप्रिल रोजी झालेल्या सभेत एकमताने स्वीकारला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पारंपारिक शिक्षण पद्धतीतील कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमधील भिंती काही अंशी नाहीशा होणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना तीन वर्षांची किंवा चार वर्षांची पदवी पूर्ण करण्याचा विकल्प उपलब्ध आहे. यापैकी चार वर्षांची पदवी ही पूर्णतः वैकल्पिक असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार ऑनर्स किंवा ऑनर्स विथ रिसर्च ही पदवी चौथ्या वर्षात मिळू शकते. यापूर्वीच्या शैक्षणिक धोरणानुसार एखादा विद्यार्थी पदवीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षानंतर काही कारणास्तव शिक्षण पूर्ण करू शकला नाही तर त्याचा वापर शैक्षणिक अहर्ता म्हणून कोणत्याही ठिकाणी करता येत नव्हता. सुधारित शैक्षणिक धोरणानुसार एखाद्या विद्यार्थी पदवीचे प्रथम वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कारणास्तव शिक्षण सोडू इच्छित असेल तर त्याला पदवी प्रमाणपत्र आणि एखादा विद्यार्थी पदवीचे द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कारणास्तव शिक्षण सोडू इच्छित असेल तर त्याला पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

महाविद्यालयाने मुख्य विषय (Discipline Specific Major), वैकल्पिक मुख्य विषय, उप विषय, खुले विकल्प, कौशल्याधिष्ठित विषय, मूल्यशिक्षण, क्षमता निर्धारण आणि भारतीय ज्ञानपरंपरेवर भर देणारे विषय, नोकरी प्रशिक्षण, क्षेत्र प्रकल्प, समुदाय प्रतिबद्धता प्रकल्प, सह-शैक्षणिक उपक्रम, संशोधन प्रकल्प या सहा महत्त्वाच्या घटकांना अनुसरून विद्यार्थ्यांना अनेक विकल्प महाविद्यालयाच्यावतीने खुले करून देण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार प्रथम वर्षात मुख्य विषयाची निवड करावी लागते. मात्र महाविद्यालयाने विद्यार्थी हित लक्षात घेऊन पहिल्या वर्षांमध्ये मुख्य-विषय आणि उप-विषय यांना सारखाच श्रेयांक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे द्वितीय वर्षात गेल्यानंतर विद्यार्थ्यांना मुख्य विषयात बदल करण्याची नामी संधी मिळणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com