
जिल्हास्तरीय ओपन चॅलेज तायक्वांदो स्पर्धेमध्ये मंडणगड
१८ (टुडे पान २ साठी)
- rat४p१३.jpg ः
२३M००४४३
मंडणगड ः पदक विजेत्या खेळाडूंसह जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तालुका अध्यक्ष प्रशांत सुर्वे, प्रशिक्षिका काजल लोखंडे, प्रशिक्षक अभिषेक मर्चंडे आदी.
--------------
जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत
मंडणगड अॅकॅडमीचा दबदबा
मंडणगड, ता. ४ ः रत्नागिरी तायक्वॉंदो असोसिएशनच्या मान्यतेने तायक्वॉंदो स्पोर्ट्स अॅकॅडमी ऑफ दापोली आयोजित १६ वी क्युरोगी व १० वी पुमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वॉंदो स्पर्धा २०२३ सेवाव्रती शिंदे गुरूजी सभागृह नवछात्रालय, शिवाजीनगर, दापोली या ठिकाणी २५ ते २७ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मंडणगड तालुका तायक्वॉंदो अॅकॅडमीच्या १९ खेळाडूंनी सहभाग नोंदवून २० पदके जिंकून आपला दबदबा कायम राखला आहे. हे यश संपादन केलेल्या सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षणकांचे मंडणगड तालुक्यातून अभिनंदन होत आहे. या स्पर्धेमध्ये विशेष गटात हितांश पाटीलला सुवर्ण, कुंतल कोकाटे रौप्य, श्रेया कदम एक रौप्य व सबज्युनिअर गटात एक कांस्य, सबज्युनियर गटात प्रशिक मर्चंडेला एक रौप्य व एक कांस्य, आराध्या कोलबेकर रौप्य, स्वेच्छा सागवेकर कांस्य, कॅडेड गटामध्ये आरूषी पंदिरकर रौप्य, आर्थव भोपने कास्य, ज्युनिअर गटातून आयुश दळवीला सुवर्ण, पलक कोकाटेला रौप्य, प्रणव जाधवला कास्य, स्वराज एैनकरला कास्य, दीक्षा येलवेला कास्य तर सीनिअर गटात मयुरी खांबेला सुवर्ण, तृशाली चव्हाणला सुवर्ण, शुभम करावडेला सुवर्ण, अभिशेक मर्चंडेला कांस्य, सीनियर पुमसे गटात काजल लोखंडेला सुवर्ण, विश्वदास लोखंडेला सुवर्ण यांनी पदके मिळवून यश संपादन केले. या स्पर्धेत संघ प्रशिक्षक म्हणून काजल लोखंडे व अभिषेक मर्चंडे यांनी काम पाहिले. या सर्व खेळाडूंना तालुका अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.