Sat, Sept 30, 2023

तळेरेत उद्या विविध कार्यक्रम
तळेरेत उद्या विविध कार्यक्रम
Published on : 4 May 2023, 12:06 pm
तळेरेत उद्या विविध कार्यक्रम
तळेरेः चाफार्डेवाडी येथील श्री ब्राम्हणदेव, महापुरुष देवस्थानच्यावतीने शनिवारी (ता. ६) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. शनिवारी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ स्थानिक भजने, रात्री ९.३० वाजता कोल्हापुर येथील कलापथक सांस्कृतिक मंडळाचा ऑर्केस्ट्रा हंगामा सादर होणार आहे. त्यासोबत कौटुंबिक नाटिका होणार आहे.
----------
देवगड येथे बुधवारी शिबिर
देवगडः मधुमेह असणार्या रूग्णांच्या डोळ्यांची तपासणी शिबीर बुधवारी (ता.१०) सकाळी १० ते दुपारी ४.३० या वेळेत येथे आठवले कँपसमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-------------