
-टेरवमधील भवानी वाघजाई मंदिराचा सोमवारी वर्धापन दिन
२७ (पान २ साठी)
- ratchl४६.jpg ः
२३M००५२६
टेरव येथील श्री कुलस्वामिनी भवानी
--
टेरवमधील भवानी वाघजाई मंदिराचा
सोमवारी वर्धापन दिन
चिपळूण, ता. ४ ः श्री क्षेत्र टेरव येथील आद्यशक्ती श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई शक्तिपिठाचा बारावा वर्धापनदिन सोहळा ८ मे रोजी मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आद्यशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी जगदंबा माता, आबालवृद्धांचे श्रद्धास्थान, महाराष्ट्राचे कुलदैवत आणि ग्रामदैवत श्री वाघजाई मातेसह इतर देवतांची स्थापना अंदाजे ५०० वर्षापूर्वी सन १५१० ते १५१२ या काळात टेरवमध्ये करण्यात आली. हिरव्यागार देवरहाटीमध्ये वसलेल्या या मंदिराची दूरवस्था झाल्यामुळे सन १८३९ ला या मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार झाल्याची इतिहासात नोंद आहे. त्यानंतर या जुन्या लाकडी कौलारू मंदिराच्या नवीन वास्तू उभारणीचा संकल्प करून ८ मे २०११ रोजी या नूतन मंदिराचे उद्घाटन व कलशारोहण श्रीमंत जगत्गुरू शंकराचार्य, करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते आणि हभप भारती महाराज, आळंदी देवाची यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
१२ व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (ता. ८) मे रोजी सकाळी अभ्यंगस्नान, अभिषेक, नवचंडी याग, दुपारी महाआरती, महाप्रसाद, हळदीकुंकू व महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री हरिपाठ व महाआरती इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या बाराव्या वर्धापनदिनी सहपरिवार, मित्रमंडळींसह उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.