चिपळूण-श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम

चिपळूण-श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम

फोटो ओळी
- rat४p२१.jpg -KOP२३M००५१२ चिपळूण ः नृत्य सादर करताना कलाकार.
--------------

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम
चिपळूण, ता. ४ ः येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सलग दोन दिवस श्री देव जुना कालभैरव मंदिराच्या रंगमंचावर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. पहिल्या दिवशी कलारत्न ग्रुपचा लोकनृत्यांचा बहारदार कार्यक्रम झाला तर २ मे रोजी नाटक कंपनी प्रस्तुत हौसफुल्ल- ४ व लोकनृत्यांचा कार्यक्रमाचा आरंभ सुधीर शिंदे यांच्या हस्ते झाला. कलारत्न ग्रुपने गणपती नृत्य, कोळी, डीवली समई नृत्य, पोवाडा, शंकर, शेतकरी, कॉमेडी डान्स अशी विविधांगी कला सादर करून रसिकांची दाद मिळवली.
दुसऱ्या दिवशी नाटक कंपनी चिपळूण प्रस्तुत हौसफुल्ल हा नाट्यचळवळीचा प्रवास उलगडणारा नाट्यप्रयोग झाला. या वेळी रमेश चिपळूणकर, उदयकुमार सन्नाक यांचा सत्कार करण्यात आला. नाट्य चळवळीत योगदान देणाऱ्या नाटक कंपनी चिपळूणच्या सावरी शिंदे, आदेश कांबळी, प्रद्युम्न देवधर व सहकाऱ्यांचाही विशेष सन्मान या वेळी करण्यात आला. सूत्रसंचालक प्रकाश गांधी यांनी केले.
हौसफुल्लच्या सुरवातीला शहरातील नृत्य मल्हार कथ्थक ॲकॅडमीच्या नृत्य शिक्षिका स्कंधा चितळे व त्यांच्या सहकाऱ्यांची गणेशवंदना झाली. अप्रतिम नृत्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. स्कंधा चितळे यांच्यासोबत राणा जोशी, मानसी लिंगायत, श्रेया पाटकर, मनस्वी शिरकर, आदिती आगवेकर, साई जोशी यांनी नृत्य सादर केले. यानंतर स्वरांगी जोशी व रूद्र बांडागळे यांनी नाटुकली सादर केली. सांस्कृतिक केंद्र बंद असल्यामुळे बालकलाकारांचे नेमके काय नुकसान झाले, चिपळूणमधील नाट्यरसिक आणि नाट्यकलाकार यांचे नेमके काय नुकसान झाले, याची व्यथा अत्यंत नेमक्या शब्दात या नाटुकलीतून मांडत करोडो रुपये खर्च करून दुरुस्त झालेले सांस्कृतिक केंद्र तातडीने सुरू करा, अशी आर्त साद या बालकलाकारांनी घातली. यानंतर डीबीजे महविद्यालयाची संकेत हळदे लिखित व दिग्दर्शित हॅप्पी फादर्स डे ही एकांकिका सादर झाली. निवेदन योगेश बांडागळे आणि श्रवण चव्हाण यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com