निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या आरोपीला शिक्षा
११ (पान ३ साठी)
निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या शिक्षा
रत्नागिरी, ता. ४ ः वाहन निष्काळजीपणे चालवून शोरूममधील वाहनांचे नुकसान करणाऱ्याला न्यायालयाने सहा महिन्याचा सश्रम कारावास व सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
प्रशांत चव्हाण (वय २६, रा. रत्नागिरी) असे त्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ६ फेब्रुवारीला २०२२ दुपारी एमआयडीसी मिरजोळे येथे घडली होती.
संशयिताने आपल्या ताब्यातील वाहन हे एमआयडीसी-मिरजोळे येथे लागलेली आग विझवून परत वाहन घेऊन रस्त्यावरून जात होता. त्या वेळी गाडीच्या उजव्या बाजूचा मागील दरवाजाचे झडप उघडे ठेवून गाडी निष्काळजीपणे चालवत होता. या गाडीच्या दरवाजाची उघड्या झडपाची शोरूम-गोडाऊनच्या भिंतीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, शोरूमच्या भिंतीचे चिरे व सिमेंटचे ब्लॉक गोडाऊनमध्ये असलेल्या कंपनीच्या वाहनांवर पडले. यामध्ये नऊ गाड्यांचे नुकसान झाले. या प्रकरणी अमित चंदुलाल पटेल यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
तपास सहाय्यक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी केला. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याचा निकाल बुधवारी (ता. ३) झाला. सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस हेडकॉन्स्टेबल दुर्वास सावंत, महिला पोलिस हवालदार संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.