आरटीओ कार्यालयात 9 ऑनलाईन सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीओ कार्यालयात 9 ऑनलाईन सुविधा
आरटीओ कार्यालयात 9 ऑनलाईन सुविधा

आरटीओ कार्यालयात 9 ऑनलाईन सुविधा

sakal_logo
By

पान ३ साठी)

आरटीओ कार्यालयात
९ ऑनलाईन सुविधा
रत्नागिरी, ता. ४ : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनधारकांसाठी दोन वेगवेगळ्या प्रणालीच्या माध्यमातून ९ ऑनलाईन सुविधा सुरू केल्या आहेत. १ मेपासून फ्री वायफाय सुविधाही सुरू करण्यात आल्याचे परिवहन कार्यालयाने कळवले आहे.
परिवहन विभागातील विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने झाल्या आहेत. त्यापैकी सारथी प्रणालीवर असणाऱ्या सेवा नवीन शिकाऊ परवाना, नवीन चालक परवाना, नवीन वाहक परवाना, परवान्याची माहिती आणि दुय्यम परवाना तर वाहनप्रणालीद्वारे आकर्षक क्रमांक शोधणे, राष्ट्रीय परवाना, दुय्यम नोंदणी पुस्तक पत्त्यावरील बदल, मालमत्तेचे हस्तांतरण इत्यादी कामे फेसलेस पद्धतीने या कार्यालयात ऑनलाईन सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे कार्यालयात येणाऱ्या जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याकरिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी येथे फ्री वायफाय सुविधा १ मे पासून सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा जनतेने फायदा घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे.