जादा रेल्वे गाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जादा रेल्वे गाडी
जादा रेल्वे गाडी

जादा रेल्वे गाडी

sakal_logo
By

पुणे ते रत्नागिरीसह
पनवेलला जादा गाडी
कणकवली, ता. ४ ः कोकण रेल्वे मार्गावर पुणे ते रत्नागिरी आणि पनवेल ते रत्नागिरी अशा जादा गाड्या धावणार आहेत. उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते रत्नागिरी ही अनारक्षित विशेष गाडी आहे. गाडी क्र. ०११३१ पुणे ते रत्नागिरी ही पुणे जंक्शन येथून २५ मे पर्यत दर गुरुवारी रात्री ८.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीसाठी गाडी क्र. ०११३२ रत्नागिरी ते पुणे अनारक्षित गाडी रत्नागिरी येथून दर शनिवारी २७ मे पर्यत दुपारी १ वाजता सुटून पुणे जंक्शनला रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकावर थांबेल.
रत्नागिरी ते पनवेल ही अनारक्षित विशेष गाडी आहे. गाडी क्र. ०११३३ रत्नागिरी - पनवेल रत्नागिरी येथून २६ मेपर्यत दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटेल. गाडी क्र. ०११३४ पनवेल ते रत्नागिरी ही गाडी पनवेल येथून २६ मे पर्यत दर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता सुटेल. ही गाडी संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबेल.