
-रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ उद्या राजापुरात मोर्चा
पान १
२३M००५८९
राजापूर ः पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे. शेजारी अभिजित गुरव, अशफाक हाजू, हनिफ काझी, उल्का विश्वासराव आदी.
-
रिफायनरीच्या समर्थनार्थ
उद्या राजापुरात मोर्चा
नीलेश राणे ; समर्थकांची ताकद दाखवणार
राजापूर, ता. ४ ः भविष्यातील पिढीच्या भवितव्यासाठी रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ शनिवारी (ता. ६) राजापूरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाद्वारे प्रकल्प समर्थनाची ताकद दाखविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी बारसूची जागा रिफायनरीसाठी पत्राद्वारे सूचित केली होती. मात्र, मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर बारसू का नको? हे त्यांना माहित असल्याचे सांगताना श्री. ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका राणे यांनी केली. शासकीय विश्रामगृहात त्यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. नीलेश राणे म्हणाले, प्रकल्प समर्थनार्थ होणारा मोर्चा सकाळी ११ वा. जवाहरचौक येथून काढण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार आदी सहभागी होणार आहेत. प्रकल्प समर्थनाची बाजू मोठी असून रिफायनरी समर्थकांची ताकद दाखविण्याची हीच वेळ आहे. शनिवारी उद्धव ठाकरे राजापूर दौऱ्यावर येत असल्याने या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले नाही.