बचगटांची कर्ज उचल करण्यात आघाडी

बचगटांची कर्ज उचल करण्यात आघाडी

बचतगटांची कर्ज प्रकरणात आघाडी
ग्रामीण जीवनोन्नती अभियानः वर्षभरात ११२ कोटींचे वितरण
विनोद दळवीः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३६१८ बचतगटांना १११ कोटी ८५ लाख ५४ हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या १७२.०९ टक्के कर्ज वितरण केले आहे. कर्ज वितरणात जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी राहिला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत बचतगटांना व्यवसायासाठी कर्ज वितरण केले जाते. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला ३४०० बचतगटांना ६५ कोटींचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने हे उद्दिष्ट पार केले आहे. ३४०० बचतगटांचे उद्दिष्ट असताना ३६१८ बचतगटांना कर्ज वितरण करीत उद्दिष्टांच्या १०६.४१ टक्के काम केले आहे. तर आर्थिक उद्दिष्टासाठी ६५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना १११ कोटी ८५ लाख ५४ हजार एवढे कर्ज वितरण केले आहे. एकूण उद्दिष्टांच्या १७२.०९ टक्के काम झाले आहे.
------------
फिरता निधी वितरणात उद्दिष्ट पूर्ण
महिलांचा नव्याने बचतगट स्थापन झाल्यावर त्यांना तीन महिन्यांनी १५ हजार रुपयांचा फिरता निधी दिला जातो. यासाठी ८०२ बचतगटांचे उद्दिष्ट होते. जिल्ह्यात यावर्षी ८८० बचतगटांना हा निधी देण्यात आला आहे. हे काम १०९.७३ टक्के झाले आहे. यासाठी एक कोटी १६ लाख २२ हजार रुपयांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात एक कोटी ३१ लाख ८२ हजार रुपयांचे वितरण करण्यात आल्याने ११३.४२ टक्के काम झाले आहे.
------------
समुदाय गुंतवणूक निधी वितरणात ३९ टक्के काम
बचतगट स्थापनेनंतर सहा महिन्यांनी ६० हजार रुपये समुदाय गुंतवणूक निधी दिला जातो. यासाठी बचतगट महिलांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हे केला जातो. यासाठी सूक्ष्म गुंतवणूक आराखडा केला जातो. त्यानंतर निधी वाटप केले जाते. २०२२-२३ करीता ६८५ बचतगटांचे उद्दिष्ट होते. प्रत्येक्षात २६७ बचतगटांना हा निधी देण्यात आल्याने ३८.९८ टक्के काम झाले आहे. तर ४ कोटी ११ लाख रुपये निधी वितरण करायचे उद्दिष्ट होते. प्रत्येक्षात एक कोटी ६० लाख २० हजार रुपये निधी वितरीत करण्यात आल्याने ३८.९८ टक्के काम झाले आहे.
----------------
उत्पादक गटमध्ये ५६.४१ टक्के काम
स्थापन करण्यात आलेल्या बचतगट महिलांतील समान व्यवसाय करणाऱ्या १५ ते ४० महिलांची निवड करीत उत्पादक गट स्थापन केला जातो. त्यांना दोन लाख रुपये दिले जातात. यातील दीड लाख प्रत्यक्ष व्यवसायासाठी तर ५० हजार रुपये व्यवसायाला लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी दिले जातात. यासाठी एन आर एल एम अंतर्गत यावर्षी दोडामार्ग, कणकवली, मालवण, वैभववाडी या चार तालुक्यांची निवड करण्यात आली होती. असे १० उत्पादक गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट असताना १३ स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे १३० टक्के काम झाले आहे. तर १९ गटांना ३९ लाख रुपये वितरीत करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १६ बचतगटांना २२ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहे. ५६.४१ टक्के काम झाले आहे.
-----------
एनआरईटीपी अंतर्गत २७ गट स्थापन
एनआरईटीपी अंतर्गत उत्पादक गट स्थापन करण्यासाठी २४ एवढे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २७ गट स्थापन झाल्याने ११२.५० टक्के काम झाले आहे. तर ७५ उत्पादक गटांना आर्थिक एक कोटी ५० लाख रुपये वितरीत करण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ५३ उत्पादक गटांना एक कोटी २ लाख ९७ हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ६८.६५ टक्के एकूण काम झाले आहे.
---------------
विविध योजनांचाही बचगटांना लाभ
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला बचतगटातील महिलांचा विमा उतरविणे, पेन्शन योजनेचा लाभ देणे आदी योजना राबविल्या जातात. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेसाठी ६९ हजार ७६८ महिलांचे उद्दिष्ट असताना ७० हजार १६५ एवढ्या महिलांना याचा लाभ मिळाल्याने १००.५७ टक्के काम झाले आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी ९२ हजार ८४२ सदस्यांचे उद्दिष्ट होते. ९४ हजार ४८६ सदस्यांना याचा लाभ दिल्याने १०१.७७ टक्के काम झाले आहे. अटल पेन्शन योजनेसाठी ३३८८ उद्दिष्ट होते. ३६३० सदस्यांना लाभ मिळाल्याने १०७.१४ टक्के काम झाले आहे.
---------------
कर्ज पुरवठा भौतिक व आर्थिक तक्ता (लाखात)
**********भौतिक प्रगती*आर्थिक प्रगती
अ.क्र*तालुका*उद्दिष्ट*साध्य*उद्दिष्ट*साध्य
१*देवगड*३९०*३५४*७३०.८*८३६.४०
२*कुडाळ*५८४*११२१.३*१९२१.९६
३*सावंतवाडी*५४२*६३७*१०४०.६*२२९९.३५
४*वेंगुर्ले*३८४*३६६३*७२७.३*९०१.३४
५*दोडामार्ग*२६७*२४८*५१२.६*८०६.८२
६*कणकवली*५४३*८१२*१०४२.६*२७३०.८७
७*मालवण*५१०*४८०*९७९.२*११३२.५०
८*वैभववाडी*१८०*१७६*३४५.६*५५६.३०
९*एकूण*३४००*३६१८*६५००.००*१११८५.५४
--------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com